उदयनराजेंच्या धक्कातंत्राची साताऱ्यात चर्चा, सातारा जिल्हा बँक निवडणूकीत ११ उमेदवार बिनविरोध

Udyanraje Bhonsle elected as unopposed in Satara District Co Operative Bank election

Update: 2021-11-10 15:12 GMT

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरून बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, अनेक नाट्यमय घडामोडीनंतर सत्ताधारी पॅनलवर आरोप प्रत्यारोप करणारे खासदार उदयनराजेंसह आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले असे एकूण 11 उमेदवार जिल्हा बँकेच्या निवडणूकीत बिनविरोध निवडून झाले आहेत.

त्यामुळे उदयनराजे भोसले यांच्या धक्कातंत्राची सध्या जिल्ह्यात मोठी चर्चा आहे. मध्यंतरी उदयनराजे यांनी दिवाळीचे निमित्त म्हणून सातारा जिल्ह्यातील सर्व नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. त्याचा फायदा झाल्याचं दिसून येत आहे.

शिवेंद्रसिंहराजे यांची घेतली भेट...

गेली अनेक दिवस आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विरोध करणारे खासदार उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुरुची निवासस्थानी जाऊन त्यांना ही धक्का दिला. जिल्हा बँकेत निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल त्यांना ही शुभेच्छा दिल्या. तर सुरुची बंगल्यावर भेट देण्यासाठी आलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांना माझा कधीच विरोध नसल्याची भूमिका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

Full View

Tags:    

Similar News