NDTVने दिलेली बातमी खोटी, काँग्रेसचा खुलासा

Update: 2022-03-13 02:31 GMT

पाच राज्यांमधील निवडणुकांमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने कार्यकारिणीची बैठक रविवारी बोलावली आहे. पण या बैठकीमध्ये गांधी परिवारातील सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आपापल्या पदांचा राजीनामा देणार आहेत, असे वृत्त NDTVने सुत्रांच्या हवाल्याने दिले होते. पंजाबमध्ये काँग्रेसने सत्ता गमावली ततर उर्वरित राज्यांमध्येही काँग्रेसला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. यानंतर पक्ष संघटनेमध्ये आमुलाग्र बदलांची आवश्यकता असल्याचे मत काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेते व्यक्त करु लागले आहेत. तसेच गांधी परिवाराच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. पण या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आपापल्या पदांचा राजीनामा देणार आहेत, असे वृत्त एनडीटीव्हीने दिले होते. याचा मात्र काँग्रेसने इन्कार केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी एनडीटीव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिलेले वृत्त अयोग्य, चुकीचे आणि खोडकरपणाचे आहे, असे म्हटले आहे. भाजपमधील सुत्रांच्या हवाल्याने एखाद्या टीव्ही चॅनेलने अशाप्रकारच्या प्रपोगंडा स्टोरीज चालवणे योग्य नाही असेही सुरजेवाला यांनी स्पष्ट केले आहे.

Similar News