"चुपचाप मान लेना कि बजट अच्छा है" ऑलिम्पिक मेडल विजेत्या बॉक्सरचा मोदी सरकारला टोला

Update: 2022-02-02 04:44 GMT

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी देशाचे बजेट सादर केले. या बजेटबद्दल विविध स्तरातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षांनी मोदी सरकारचे हे बजेट सामान्यांची निराशा करणारे असल्याची टीका केली आहे. तर कर सवलत न दिल्याने करदात्यांच्या पदरातही काहीही न पडल्याची नाराजी व्यक्त होते आहे. पण आता याच बजेटवरुन मोदी सरकारवर भारतातर्फे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या बॉक्सरने टोला लगावला आहे. ऑलिम्पिक मेडल विजेता विजेंदर सिंह याने ट्विट करुन मोदी सरकारवर बजेट संदर्भात टीका केली आहे.

"भाई चुपचाप मान लेना कि बजट अच्छा है, वरना 2000 करोड़ विज्ञापन में ये बताने के लिए खर्च कर दिया जाएगा की बजट बहुत अच्छा है #Budget2022"


अशा स्वरुपाचे ते ट्विट आहे. विजेंदर सिंगने याआधी २०१९मध्ये काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली होती. शेतकरी आंदोलनातही सहभागी होत त्याने मोदी सरकारविरोधात भूमिका मांडली होती. तसेच आपला पुरस्कार परत करणार असल्याची घोषणा केली होती. पण काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेतल्याने विजेंदर सिंग यांने पुरस्कार वापसीचा निर्णय तूर्तास मागे घेतल्याचे जाहीर केले होते. पण जोपर्यंत शहीद शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन संपले आहे, असे म्हणता येणार नाही, असेही विजेंदर सिंगने म्हटले आहे.

Similar News