अतिवृष्टीचा फटका, शेतकऱ्याने द्राक्ष बाग कापली

Update: 2020-11-07 11:30 GMT

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. पावसामुळे द्राक्ष बागांवर दीर्घकालीन परीणाम झाले. पाऊस आणि खराब हवामान यामुळे डाऊनी या रोगाचा प्रादुर्भाव बागांवर मोठ्या प्रमाणात झाला. त्याला आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा औषध फवारणी वर मोठा खर्च होत आहे. ज्या शेतकऱ्याने कर्ज काढून कष्टाच्या जीवावर बाग फुलवली आहे त्यांना जर बाग टिकवायची असेल तर त्यासाठी आणखी औषधासाठी खर्च करावा लागत आहे. सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने तर आपल्या द्राक्ष बागेवर कुऱ्हाड फिरवली आहे.

बाग उभी करताना सलग दोन वर्षे नुकसानीच्या परिस्थितीला सामोरे जाऊन कर्जबाजारी झालेल्या सांगली जिल्ह्यातील सुळेवाडी (विटा) येथील चंद्रकांत पवार या शेतकऱ्याने आपल्या बागेवर कुऱ्हाड चालवली. तीन वर्षे वयाच्या बागेवर कुऱ्हाडीने घाव घालताना शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले.

आता पतसंस्थेचे काढलेले कर्ज फेडायचे कसे मुलांना जगवायचे कसे या तणावात आत्महत्या करण्याचे विचार मनात येत आहेत असेही या शेतकऱ्याचे म्हणणे आहे.

अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सरकारने आश्वासनांचा, घोषणांचा मुसळधार पाऊस पडला. या पावसाने शेतकऱ्यांच्या आडव्या झालेल्या बागा मात्र आता फुलू शकत नाही. शेतकऱ्याला या काळात जगवायचे असेल तर केवळ कागदी घोडे न नाचवता सरसकट नुकसान भरपाई दिली पाहिजे. नाहीतर महाराष्ट्रात येत्या काळात आत्महत्यांचे प्रमाण आणखी वाढेल.Full View

Similar News