म्युकरमायसीस नंतर आता एस्परजिलोसिस म्हणजेच पिवळ्या बुरशीचा धोका...

Update: 2021-06-26 06:31 GMT

कोरोना झालेल्या रुग्णांना आता म्युकरमायसीस म्हणजेच काळी बुरशी नंतर एस्परजिलोसिस म्हणजे पिवळया बुरशीजन्य संसर्गाचे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे नव्याने चिंतेत भर पडली आहे. ह्या आजाराचे जळगाव जिल्ह्यात दोन रुग्ण आढळून आले असून पुणे येथे या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

काळ्या आणि पांढऱ्या बुरशीनंतर आता कोरोनाच्या रुग्णांमध्ये इतर बुरशीजन्य संक्रमण दिसू लागले आहे. त्यातीलच एस्परजिलोसिस हा बुरशीजन्य प्रकार समोर आला आहे.

रोगप्रतिकार क्षमता कमी असलेल्या लोकांना याचा धोका अधिक आहे. पिवळया बुरशीजन्य संसर्ग आपल्या सभोवतालच्या वातावरणातच असतो असं तंज्ज्ञाच मत आहे.

कोणती लक्षण आहेत?

कोरोना झालेल्या रुग्णांना याचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. श्वास घ्यायला त्रास होणे, ताप आणि थंडी ह्या आजाराची प्रमुख लक्षण आहेत.

कोरोनामधून बरे झाल्या नंतरही ताप येत असल्यास हे एस्परजिलोसिस लक्षण असू शकतात. हा संसर्ग फुफ्फुसापर्यंत पोहोचला असेल तर खोकला कायम राहतो, काहींना खोकल्यासह रक्त ही येऊ शकतं. पिवळी बुरशी मेंदूपर्यंत पोहचली तर डोके आणि डोळ्यांना वेदना होतात थकवा आणि अशक्तपणा वाढ होऊन स्किन इन्फेक्शन ही होण्याचा धोका आहे.

असे करा निदान

एस्परजिलोसिस म्हणजेच पिवळ्या बुरशीच निदान हे करायला थोडं अवघड जात असलं तरी बायोस्पी, रक्त चाचण्या, छातीचा एक्सरे, सिटी स्कॅन, आणि फुफ्फुस स्कॅन केल्यावर याचे निदान केलं होते.

या आजारात घाबरून न जाता काळ्या आणि पांढऱ्या बुरशी प्रमाणे उपचार केले जातात. असं कॅन्सर तज्ज्ञ डॉ निलेश चांडक यांचं म्हणणं आहे.

कोरोना च्या महामारीत वेगवेगळे आजार समोर येत असले तरी आपली प्रतिकारक्षमता वाढवणे आवश्यक असल्याचे त्याचबरोबर कोरोनाचे सर्व नियम काटेकोर पालन केल्यास या आजारातून आपण दूर राहू शकतो.

Tags:    

Similar News