'इमरजेंसी कोविड रिस्पॉन्स पॅकेज'ची 15 टक्के रक्कम केंद्राने पाठवली

Update: 2021-07-31 07:16 GMT

मुंबई :  केंद्र सरकारकडून कोरोना विरोधातील लढाईसाठीच्या 'इमरजन्सी कोविड रिस्पॉन्स पॅकेज' च्या एकूण रक्कमेपैकी 15% म्हणजेच 1827.80 कोटी रूपये राज्य सरकार तसेच केंद्र शासित प्रदेशांकडे पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्राचा विचार केला तर मागील आठवड्याभरापासून राज्यात कोरोनाच्या रूग्णांची अचानक वाढ होताना पाहायला मिळत आहे. पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार राज्यात मागील चोवीस तासात 6 हजार 600 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर देशात 41 हजार 49 एवढ्या कोरोना रूग्णांची भर पडली आहे.

विशेष म्हणजे देशाचा विचार केला असता एकट्या केरळच्या रुग्णांची संख्या ही देशाच्या निम्म्यावर असल्याची माहीती समोर आली आहे. त्यामुळे केरळमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. केरळमध्ये तब्बल 20 हजार 772 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेत. तर 116 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहीती प्रशासनाने दिली आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर बारामती, लातूर, बीड अशा ठिकाणी कोरोनाचा रूग्णसंख्या झपट्याने वाढतांना दिसत आहे.

राज्यात मागील चोवीस तासात साडे सहा हजार रूग्ण आढळून आले असतांना, येत्या दोन दिवसांमध्ये हाच आकडा 10 हजाराच्या घरात जाण्याची भीती व्य्कत होत आहे. राज्यात सक्रिय रुग्णांचा आकडा हा 77 हजार 494 एवढा आहे. तर आतापर्यंत राज्यात 1 लाख 32 हजार 566 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारने तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येते आहे.



Tags:    

Similar News