सावधान; पुढचे काही आठवडे खबरदारीचे:डॉ संग्राम पाटील

Update: 2021-07-18 02:33 GMT

courtesy social media

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचं संकट आहे का? पुढचे काही आठवडे काय खबरदारी घ्यावी? कोरोना पासून वाचण्याचा दहासुत्री कार्यक्रम काय आहे?

1. लशीचे दोन्ही डोस लवकरात लवकर घ्या. लस प्रोटेक्ट करते आणि जीव वाचवते

2. कुणाला भेटाल तर मोकळ्या हवेत किंवा हवेशीर खोलीत भेटा

3. स्वतःबरोबरच इतरांच्या सुरक्षेचा व नक्की करा. आपल्यामुळे दुसऱ्यांना धोका नको

4. मास्क करोनापासून वाचवतो, लोकांमध्ये जाल तेव्हा मास्क नक्की लावा. लस घेतली असेल तरी मास्क वापरा.

5. सोशल डिस्टंस आजही गरजेचं आहे. इतरांपासून कमीत कमी 1 मीटर अंतर ठेवा, आणि शक्य झाल्यास दोन मिटर.

6. हात स्वछता- वारंवार हात धुवा, किंवा सॅनिटायझर वापरा. इतर कुठे हाथ लावला असल्यास स्वतःच्या चेहऱ्याला, डोळ्यांना हात लावू नका.

7. तुम्हाला सर्दी, घसा, डोकंदुखी असल्यास कुणालाही भेटणे टाळा. तसेच कुणाला सर्दी, घसा, डोकंदुखी असल्यास त्यांना भेटणे टाळा. प्रत्येक करोना रुग्णाला ताप आणि खोकला असेलच असे नाही. कुठलेही लक्षणं आल्यास /शंका आल्यास स्वाब करून घ्या.

8. तुमची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास तुमच्या संपर्कात आलेल्या लोकांना कळवा, म्हणजे ते दहा दिवस आयसोलेट होतील आणि स्वतःच्या लक्षणांवर लक्ष ठेवतील.

9. 3 'C' चा नियम लक्षात ठेवा- Close संपर्क नको, Closed खोलीत भेटणे नको, Crowd मध्ये जायला नको.

10. सोशल मीडिया मधील अफवांवर विश्वास ठेऊ नका, तज्ज्ञ आणि विश्वासू संस्था यांच्याकडून आलेली माहिती फक्त अंमलात आणा. स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवा

डॉ संग्राम पाटील

Full View
Tags:    

Similar News