Covid19 : "मोदी सरकारने वेळीच पावलं उचलली असती तर 1 लाख मृत्यू टळले असते"

Update: 2021-07-29 05:49 GMT

देशात कोरोना बळींची संख्या 4 लाखांच्यावर गेली आहे. पण यापैकी 1 लाख मृत्यू टाळता आले असते, असे मत अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील नामांकीत प्राध्यापक भ्रमर मुखर्जी यांनी व्यक्त केली आहे. भ्रमर मुखर्जी ह्या महामारी आणि जागतिक सार्वजनिक आरोग्य या विषयातल्या नामांकीत तज्ज्ञ आहेत. द वायरसाठी ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये मुखर्जी यांनी आपली मते व्यक्त केली आहेत. भ्रमर मुखर्जी यांनी भारतात कोवीडच्या दुसऱ्या लाटेतील परिस्थितीचा सखोल अभ्यास करुन एक अहवाल नुकताच सादर केला आहे. भारतात डेल्टा व्हरायंटचा प्रसार आणि उपाययोजनांना झालेला उशीर य़ा विषयावर त्यांनी संशोधन करुन हा अहवाल तयार केला आहे.

मोदी सरकारने वेळीच पावलं उचलली असती तर 1 लाख कोरोना मृत्यू टाळता आले असते. तसेच देशात 1 कोटी 30 लाख नागरिक कोरोना बाधीत होण्यापासून वाचू शकले असते, असे मत त्यांनी मांडले आहे. केंद्र सरकारने मार्च महिन्यातच मध्यम स्वरुपाच्या लॉकडाऊनचा निर्णय़ घेतला असता तर कोरोनाबाधींतांची संख्या दिवसाला 20 ते 49 हजारांपर्यंत राहिली असती. पण त्या काळात कोनोबाधितांचा आकडा लाखांच्या वर गेला होता, तो टाळता आला असता असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

 2 महिन्यात 1 लाख 12 हजार मृत्यू 15 मार्च ते 15 मे या कालावधीत भारतात 1 लाख 12 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पण मध्यम स्वरुपातले लॉकडाऊन मार्च महिन्याच्या मध्यावर किंवा शेवटी जरी राहिली लागू केले असते तर या काळात झालेल्या मृत्यूंपैकी 90 ते 98 टक्के मृत्यू टाळता आले असते, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Tags:    

Similar News