एकनाथ शिंदे गुवाहाटीला जाण्यामागे संजय राऊत, निवडणूक आयोगासमोर शिंदे गटाचं स्पष्टीकरण

विधानपरिषद निवडणूकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदार आधी सुरत आणि गुवाहाटीला जाण्यामागे संजय राऊत असल्याचा खुलासा केला.

Update: 2023-01-31 02:04 GMT

20 जून रोजी झालेल्या विधानपरिषद निवडणूकांनंतर राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात बंड झाले. त्यावेळी शिवसेनेचे (shivsena) आधी 12 आमदार सुरत येथे गेले. त्यानंतर गुवाहाटीला असताना 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. हे आमदार महाराष्ट्रात राहून चर्चा करू शकत होते, असं उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणाले होते. मात्र हे आमदार सुरत आणि गुवाहाटीला जाण्यामागे संजय राऊत (Sanjay Raut) असल्याचा धक्कादायक आरोप शिंदे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या लेखी उत्तरात म्हटलं आहे.

शिंदे गटाने 30 जानेवारीला निवडणूक आयोगाला लेखी उत्तर सादर केले. त्यामध्ये संजय राऊत यांच्या धमक्यांमुळेच आम्हाला परराज्यात जावं लागलं, असं म्हटलं आहे. या लेखी उत्तरात शिंदे गटाच्या वतीने म्हटले आहे की, याचिकाकर्ते आणि त्यांच्या इतर समर्थक आमदारांना महाराष्ट्र सोडून इतर राज्यात जावे लागले. त्याचे कारण 23 जून 2022 रोजी प्रसिध्द झालेल्या मीडिया रिपोर्टनुसार उध्दव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असलेले संजय राऊत यांनी आमदारांना धमकी दिली. जे आमदार बाहेर गेले आहेत ते महाराष्ट्रात परतले तर त्यांना राज्यात फिरणे कठीण होईल, असं म्हटलं आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी म्हटले की, सर्व आमदारांना सभागृहात येऊ द्या. मग बघू. जे आमदार गेले आहेत. त्यांना महाराष्ट्रात फिरणे कठीण होईल. संजय राऊत यांनी अशा प्रकारे धमकावल्यामुळेच शिंदे गटाच्या आमदारांना महाराष्ट्र सोडून इतर राज्यात जावे लागले, असं लेखी उत्तर शिंदे गटाने दिले आहे.

 



 


Tags:    

Similar News