उदयनराजेंचे अजितदादांना चॅलेंज, चला ED चौकशीला एकत्र सामोरे जाऊ

Update: 2022-06-17 13:08 GMT

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी साताऱ्यामध्ये एका कार्यक्रमात उदयनराजे यांचे नाव न घेता टीका केली होती. साताऱ्यातील एमआयडीसीच्या विकासातील अडथळ्यांवरुन ही टीका कऱण्यात आली होती. त्यांच्या या टीकेला उदयनराजे भोसले यांनी उत्तर दिले आहे. “ज्यावेळी तुम्ही मंत्री होता त्यावेळी का नाही सातारच्या एमआयडीसीचा विकास केला” असा सवाल त्यांनी अजित पवारांना विचारला आहे. एवढेच नाही तर “आपण कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. हवे तर ED चौकशी करा, आपण दोघेही ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊ” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

Full View
Tags:    

Similar News