किरीट सोमय्या यांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. पण आता त्यांच्या या आरोपाल संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. “तुमच्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासाबाबत आम्ही तुम्हाला विचारतो का? मग पोलिसही जर कारवाई करत असतील तर, काही असल्याशिवाय कारवाई होत नाही ना, असा टोला राऊत यांनी लगावला आहे. तसेच जे देशद्रोही, गुन्हेगार आहेत त्यांच्याविषयी भाजपला एवढी मळमळ का? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
“केंद्राची झेड प्लस सिक्युरिटी हा एक मोठा घोटाळा आहे” असा आरोपही राऊत यांनी केला. त्याचबरोबर किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानचे सर्व अकाऊंट तपासाल गेले पाहिजेत, देणगीदारांची नावं आपण देऊ त्यापैकी अनेक देणगीदारांवर EDची कारवाई सुरु आहे, त्या देणगीदारांची कॅरेक्टर तपासा” असा आरोपही राऊत यांनी केला आहे. तसेच किरीट सोमय्या जास्त बोलत असतील तर त्यांच्या तोंडात कागद घालेन, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे. एफआयआर काय असावी हे विक्रांत घोटाळा केलेल्या आरोपीनं सांगू नये, आरोपीनं फार बोलू नये, असंही राऊत यांनी म्हटले आहे.