भाजपसोबत जाण्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार, रामदास आठवले यांचं राज्यसभेत वक्तव्य

Update: 2022-12-07 09:19 GMT

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभा सभापतींच्या स्वागत प्रसंगी बोलताना रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या स्वागत प्रसंगी बोलताना रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्तेत जायला सांगितले होते. सत्ताधारी होण्यास सांगितले होते. मात्र माझा पक्ष एकटा सत्तेत येऊ शकत नाही. त्यामुळे मी आत्ता भाजपसोबत सत्तेत आहे. यापुर्वी मी काँग्रेससोबत सत्तेत होतो. मात्र त्यानंतर माझा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पराभव करण्यात आला. त्यानंतर मला मंत्रीपदही देण्यात आलं नाही. त्यामुळे मी भाजपसोबत आलो, असल्याचे रामदास आठवले यांनी राज्यसभेत बोलताना सांगितले.

तसेच यावेळी मला नेमकं का मंत्री बनवण्यात आलं आहे, असा सवाल अनेकांकडून करण्यात येतो. या प्रश्नाचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारा, असंही रामदास आठवले म्हणाले.

Tags:    

Similar News