पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी, राजकारण न करता चौकशी व्हावी- नवाब मलिक

Update: 2022-01-06 07:41 GMT

Photo courtesy : social media

पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक होणे हा गंभीर विषय आहे, त्यामुळे याप्रकरणी केंद्र किंवा राज्यसरकारने तपास न करता हायकोर्टाच्या सिटींग न्यायाधीशांच्या माध्यमातून तपास करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाल्यानंतर भाजप आणि काँग्रेसने राजकारण करायला सुरुवात केली आहे. मात्र या सुरक्षेची जबाबदारी एसपीजी, आयबी आणि राज्यसरकारचे पोलिस या तिघांची असते. त्यामुळे चूक कुणाकडून झाली याबाबतचे हायकोर्टाच्या सिटींग न्यायाधीशांच्या माध्यमातून देशाच्या जनतेसमोर येईल असेही नवाब मलिक म्हणाले.


Full View

Tags:    

Similar News