`शिंदे` गटाच्या रडारवर आता उपसभापती निलम गोऱ्हे ; विधान परिषदेतही शिवसेनेला धडा शिकवणार ?

Update: 2022-07-05 13:10 GMT

गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी केली. तसेच भाजपसोबत येत नवीन सरकार स्थापन केले. तर विधानसभा अध्यक्षपद आणि विश्वासदर्शक ठरावाच्या निवडणुकीतही त्यांनी १६४ संख्याबळ जमवून दाखवत बहुमत सिद्ध केलं. त्यानंतर आता विधान परिषदेतही भाजपकडून शिवसेनेला मोठा धक्का देण्यासाठी रणनीती आखण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी केली. तसेच भाजपसोबत येत नवीन सरकार स्थापन केले. तर विधानसभा अध्यक्षपद आणि विश्वासदर्शक ठरावाच्या निवडणुकीतही त्यांनी १६४ संख्याबळ जमवून दाखवत बहुमत सिद्ध केलं आहे. ठाकरे गटाने शिंदे गटाच्या प्रतोदाने दिलेल्या व्हिपचे उल्लंघन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे वगळता इतर १४ सदस्यांवर निलंबनाच्या कारवाईची मागणी नवे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली होती. सुप्रिम कोर्टातही याबाबत येत्या ११ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. विधानसभेतील यशानंतर आता विधान परिषदेतही भाजपकडून शिवसेनेला मोठा धक्का देण्यासाठी रणनीती आखण्यात येत आहे.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) तर उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) आहेत. रामराजे यांच्या सदस्यत्वाचा कालावधी ७ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे सभापतिपदाची निवडणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर नीलम गोऱ्हे यांच्यावर भाजप आणि शिंदेगटाकडून अविश्वासदर्शक ठरावाची शक्यता आहे. नीलम गोऱ्हे वारंवार ठाकरे सरकारच्या प्रवक्त्यांच्या भुमिकेत होत्या. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि गोऱ्हे यांच्यात सभागृहातच यावरून अनेकदा वाद पेटल्याचे दिसले आहे.

विधानसभेत अध्यक्षपद आणि विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर विधानपरीषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधान परिषदेतील संख्याबळ पाहता भाजपकडे सध्या पुरेसं संख्याबळ नाही. भाजपचे सध्या वरिष्ठ सभागृहात २४ सदस्य आहेत. तर शिवसेनेचे ११, राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रत्येकी १० सदस्य आहेत. तर एकूण १६ जागा रिक्त असून त्यापैकी १२ जागा या राज्यपाल नियुक्त आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून १२ जणांची यादी राज्यपालांकडे दिली होती. मात्र अद्यापही राज्यपालांनी यादीला परवानगी दिली नाही. सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार लवकरच शिंदे सरकारकडून राज्यपाल नियुक्त सदस्यांची नवी यादी दिली जाणार आहे. यामधे चार जागा शिंदे गटाला मिळणार असून उर्वरीत ८ जागांवर भाजपाचा दावा आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाबरोबरच विधानपरीषद सदस्यत्वाच्या राजीनामा देण्याची घोषणा केली होती. अजूनही मुख्यमंत्र्यांच्या राजीनामा स्विकारल्याचे विधिमंडळाकडून जाहीर करण्यात आलेले नाही. आता भाजपसोबत शिंदे गटाने नवीन सरकार स्थापन केल्याने त्यांच्याकडून नवी यादी राज्यपाल मंजूर करतील. राज्यपालांनी ही यादी अंतिम केल्यास भाजप व शिंदे गट विधान परिषदेतही बहुमताचा आकडा पार करेल. त्यामुळे महाविकाडीला त्याचा मोठा फटका बसणार आहे.

विधानपरीषदेत शिवसेना पक्षातील किती आमदार शिंदे गटाकडे जाणार यावर विधानपरीषदचे गणित अवलंबून आहे. विधानपरीषद सभापतीपदी रामराजे निंबाळकरांना कायम ठेवत उपसभापती नीलम गोऱ्हेंवरील अविश्वास ठराव आणुन हटवण्याचा भाजप- शिंदे गटाचा प्रयत्न आहे. राज्यात सत्ताबदल झाल्याने आता विधानपरीषदेत विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे नियुक्त होऊ शकतात असे सध्याचे चित्र आहे.

विधान परिषदेतील पक्षानुसार संख्याबळ खालीलप्रमाणे :

भाजप – २४

शिवसेना – ११

राष्ट्रवादी काँग्रेस – १०

काँग्रेस – १०

राष्ट्रीय समाज पक्ष – १

लोकभारती – १

पीझंट्स अॅण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया – १

अपक्ष – ४

रिक्त – १६

एकूण –७८

Tags:    

Similar News