अमृता फडणवीस यांचा शेवटचा वार, शिवसेना-भाजप पुन्हा युतीची शक्यता संपली

Update: 2022-04-24 07:01 GMT

माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या ट्विटवर सक्रीय असतात आणि त्यांच्या अनेक ट्विट्सने वादही निर्माण झाले आहेत. त्यांच्या अशाच एका डिलीट केलेल्या ट्विटमुळे गंभीर राजकीय चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत संसार मांडल्यानंतर अमृता फडणवीस यांनी सातत्याने ट्विटरवरुन शिवसेनेवर प्रहार सुरू ठेवले आहेत. आतापर्यंत अमृता फडणवीस यांनी सातत्याने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली होती. पण त्यांनी कधीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका केली नव्हती. पण शनिवारी रात्री अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केले, त्यामध्ये “उध्वस्त ठरकीने कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र?” असे एका ओळीचे ट्विट केले होते.

0

किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विट केले. या ट्विटची गंभीर दखल घेतली गेली आणि काही वेळातच त्यांनी हे ट्विट डिलीट केले. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी हे ट्विट का डिलीट केले अशी चर्चा सुरू झाली आहे, की त्यांना कुणीतरी हे ट्विट डिलीट करण्यास भाग पाडले असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. कारण भाजप आणि सेना यांच्यातील संघर्ष कितीही टोकाला गेला तरी भविष्यात शिवसेनेशी तडजोड होऊ शकते, अशी आशा देवेंद्र फडणवीस यांना होती, पण अमृता फडणवीस यांनी फडणवीस यांच्या या आशेचे दोरच कापून टाकले आहेत. आता भविष्यात उद्धव ठाकरे यांच्याशी मैत्रीचे सूर जुळवण्याचा फडणवीस यांचे मनसुबे पार उधळले गेले आहेत, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. फडणवीस यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जाते आहे.

अमृती फडणवीस यांनी ९.४७ मिनिटांनी ते ट्विट केले होते, त्यानंतर काही वेळात ते ट्विट डिलीट केले आणि रात्री १२ वाजून २० मिनिटांनी त्यांनी आणखी एक ट्विट केले, “कभी लिख देते है, कभी मिटा देते है हम, पर सच का आईना, बेख़ौफ़ दिखा देते है हम !” असे म्हणत आपण उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर ठाम असल्याचे संकेत दिले. त्यामुळे फडणवीस यांनी युतीची गड पुन्हा उभे करण्याचे दोरच अमृता फडणवीस यांनी तोडून टाकल्याची चर्चा आहे.

Full View

Similar News