आमच्या बद्दल थोडंस
मॅक्समहाराष्ट्र.कॉम ही मराठीतील एक अग्रगण्य वेबसाइट आहे. मुख्यप्रवाहातील माध्यमांमध्ये वाढत चाललेलं पेड न्यूज, फेक न्यूज तसंच इतर गैरप्रकारांपासून पत्रकारितेला दूर ठेवण्यासाठी कमी गुंतवणूक असलेली समाजमाध्यमं उभी राहिली पाहिजेत यासाठी मॅक्समहाराष्ट्रची स्थापना करण्यात आली. मॅक्समहाराष्ट्र ने आजपर्यंत अनेक महत्वाच्या विषयांना वाचा फोडली आहे. सरकारी योजनांची अंमलबजावणी, महिलांचे प्रश्न, अनुसुचित जाती-जमातींवर होणारे अन्याय, बेरोजगारी, जाती-पातींवर आधारित राजकारण, भ्रष्टाचार, इतिहासाची मोडतोड, आर्थिक साक्षरता, शिक्षण, संविधानाबद्दल जागरूकता अशा अनेक मूलभूत बाबींवर मॅक्समहाराष्ट्र काम करत आहे.
पत्रकारितेत जवळपास 20 वर्षे कार्यरत असलेल्या तसंच ई टीव्ही, आयबीएन 7, जय महाराष्ट्र, मी मराठी अशा नामांकित वृत्तवाहिन्यांवर महत्वाच्या पदांवर काम करण्याचा अनुभव असलेल्या रवींद्र आंबेकर यांनी मॅक्समहाराष्ट्र ची स्थापना केली.
आमची टीम
रवींद्र आंबेकर – मॅक्समहाराष्ट्र.कॉम चे संस्थापक, संपादक रवींद्र आंबेकर यांना पत्रकारितेचा 20 वर्षांचा अनुभव आहे. आदर्श घोटाळा, वक्फ जमीन घोटाळा, संरक्षण खात्याच्या जमीनींचा घोटाळा, मालेगाव बाँबस्फोट, जम्मू-कश्मीर मधील दहशतवाद, अल्पसंख्यांकांची भारतातील स्थिती यावर युरोपियन पार्लियामेंट आणि लंडन मध्ये झालेल्या सेमिनार मधील सहभाग अशा महत्वाच्या असाइनमेंट वर त्यांनी काम केले आहे.
महाराष्ट्रातील राजकीय-सामाजिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी सलग तीन महिने राज्याचा दौरा करून जवळपास 4000 लोकांशी प्रत्यक्ष बोलून, त्यांची मतं घेऊन मॅक्समहाराष्ट्र ला सुरूवात.
निखिल वागळे – भारतीय पत्रकारितेतील एक महत्वाचं नाव. पत्रकारितेचा 40 वर्षांचा अनुभव असलेले निखिल वागळे मॅक्समहाराष्ट्रचे संपादकीय सल्लागार आहेत. आपलं महानगर, आईबीएन लोकमत, मी मराठी, टीव्ही नाईन या माध्यमांमधली त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली.
प्रियदर्शिनी हिंगे – मुक्त पत्रकारितेत 10 वर्षांचा अनुभव.मॅक्सवुमनच्या सहाय्यक संपादिका. महिला तसेच सामाजिक विषयांवर विपुल लेखन. अनेक पुस्तकांचं संपादन.
किरण सोनावणे – पत्रकारितेतील 20 वर्षांचा अनुभव. अनेक सामाजिक आणि साहित्य चळवळींमध्ये प्रत्यक्ष सहभाग. जातीय अत्याचारांच्या घटनांवर सातत्यपूर्ण लिखाण
आमचे मार्गदर्शक – राजदीप सरदेसाई, कुमार केतकर (वरिष्ठ पत्रकार), रवीश कुमार, संजीव चांदोरकर, महेश झगडे ( निवृत्त आयएएस ), सी.एस. संगीतराव ( निवृत्त आयएएस )
खरी कमाई – मॅक्समहाराष्ट्र मध्ये कुठल्याही उद्योगपतीची गुंतवणूक नाही. वाचक-प्रेक्षकांनी दिलेला सहभाग निधी, मॅक्समहाराष्ट्रच्या टीमने वैयक्तिक कामे करून उभारलेला निधी ज्याला आम्ही खरी कमाई असं नाव दिलं आहे, याच्या जोरावर मॅक्समहाराष्ट्रची वाटचाल सुरू आहे. स्वतंत्र पत्रकारितेसाठी तुम्हीही तुमचा सहभाग निधी, जाहीरात देऊ शकता.
आमचा अकाऊंट नंबर आहे –
Max Maharashtra Media Solutions Ltd
Account Number – 6516408513
Bank – Indian Bank, Nariman Point branch
IFSC code – IDIB000N052
संपर्क कुठे करायचा –
मेल – [email protected]
फोन क्रमांक – 9930676053