Home News Update एल्गार परिषद तपास : पवार- मुख्यमंत्र्यांमध्ये मतभेद

एल्गार परिषद तपास : पवार- मुख्यमंत्र्यांमध्ये मतभेद

Support MaxMaharashtra

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निर्णयाबद्दल भूमिकेबद्दल जाहिर नाराजी व्यक्त केली. एल्गार परिषद हिंसाचार प्रकरणाचा तपास करण्याचा केंद्राचा निर्णय हा राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण आहे. मात्र त्याला महाराष्ट्राने पाठिंबा देणं हे अधिकचं योग्य नसल्याची टिका शरद पवार यांनी केली आहे.

एल्गार परिषद प्रकरणी महविकास आघाडीत पहिली फूट

एल्गार परिषद प्रकरणाचा तपास एनआयएकडे न देण्याच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेला डावलत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तपास एनआयएकडे सोपवण्यास पाठिंबा दिला आहे. यावर शरद पवारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.#MaxMaharashtra

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई शुक्रवार, 14 फ़रवरी 2020

कोल्हापूर इथ झालेल्या पत्रकार परिषद घेवून शरद पवारांनी ही भूमिका मांडली. एल्गार परिषद प्रकरणी केंद्राच्या तपासाला पाठींबा देण्याचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी यांचा निर्णय शरद पवारांच्या भूमिकेला छेद देणारा आहे, असं राजकीय तज्ञांच म्हणणं आहे. त्यामुळे भविष्यात या निर्णय़ावरुन सरकारमध्ये कटुता निर्माण होवू शकते असं चित्र आहे.

एल्गार परिषद हिंसाचार प्रकरणात NIAच्या तपासाला विरोध करण्याची शिफारस गृहमंत्रालयानं केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी बहुदा ती ओव्हरुल केली असावी. मुख्यमंत्री म्हणून त्यांचा तो अधिकार आहे. असं विधान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी केलं होत.

एल्गार परिषद प्रकरण- NIAच्या तपासाबाबत १४ फेब्रुवारीला निर्णय

एल्गार परिषद प्रकरण : नव्या प्रकरणात देशद्रोहाचं कलम हटवलं…

एल्गार परिषद प्रकरण: पाच जणांना 12 सप्टेंबरपर्यंत नजरकैद…

पुणे कोर्टात याबद्दल आज सुनावणी झाली, यामध्ये सरकारी वकिलांनी NIA चौकशीला राज्य सरकारचा विरोध नसल्याची भूमिका मांडली. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गृहमंत्रालयाची शिफारस फेटाळल्याचं स्पष्ट झालंय.

NIA या केंद्रीय संस्थेला, राष्ट्रीय सुरक्षेशी संबधीत कुठल्याही प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी संबधीत राज्याच्या मंजूरीची गरज नसते. मात्र तरीही या केंद्राच्या या निर्णयाला राज्याने तात्विक विरोध करावा अशी भूमिका शरद पवारांनी घेतली होती. या संदर्भात  शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना एक पत्र लिहीलं होत. त्या पत्रावरुन गृह मंत्रालयानं या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याबद्दल पोलिस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. नेमक्या त्याच दिवशी केंद्र  सरकारने हा तपास NIA कडे सोपवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारमध्ये संघर्ष निर्माण झाला होता.

दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एल्गार प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलंय. हे प्रकरण फ्रॉड आहे. हे बोलण्याची हिंमत त्यांनी दाखवायला हवी होती.गृहमंत्र्यांनी तपास देऊ नये असं म्हटलं तर सीएमनी अधिकाराचा वापर न करता हा तपास दिला.गृहमंत्री आणि सीएम यांच्यात एकमत नसल्याचे दिसून आलयं. अशी टिकाही बाळासाहेब आंबेडकरांनी केली आहे.

एल्गार परिषदेत झालेल्या भाषणामुळे राज्यात हिंसाचार झाल्याचं पोलिसांच्या तपासातून पुढं आलं होत. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन पोलिसांनी विचारवंत, लेखकांना गोवल्याची टिका शरद पवार यांनी केली होती. या प्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांची भूमिका अंत्यत आक्षेपार्ह्य असल्याची टिकाही पवारांनी केली होती.

एल्गार परिषद हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, वरवरा राव, सुधा भारतद्वाज, अरुण परेरा, व्हर्नन गोन्साल्विस, महेश राऊत यांना अटक केली आहे. हे सर्वजण तुरुंगात आहे. नक्षलवाद्यांशी संबंध ठेवणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप या सामाजिक कार्यकर्त्यांवर ठेवण्यात आलाय.

 

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997