Home News Update हातात वस्तरा घेऊन ‘तो’ चालवतोय वाचन चळवळ

हातात वस्तरा घेऊन ‘तो’ चालवतोय वाचन चळवळ

Support MaxMaharashtra

काचेच्या समोरील खुर्चीवर बसलेल्या गिऱ्हाईकाच्या गालावर पांढराशुभ्र फेस करून दाढी करण्याच्या कामात दंग एक तरुण. आतमध्ये टाकलेल्या एका बाकड्यावर वेटींगला बसलेले कस्टमर हातात वेगवेगळी पुस्तकं घेऊन वाचत बसलेले. एकजण सलून मधल्या पुस्तकाच्या कपाटातील विविध पुस्तकं चाळत असताना दिसत होता. दुकानात कुणाचही तोंड मोबाईल मध्ये नाही समोर टीव्ही नाही. हे चित्र आहे इस्लामपूर येथील विक्रम झेंडे या वाचनप्रिय तरुणाच्या सलून मधील…

त्याच्या हातातील वस्तरा लोकांचे चेहरे स्वच्छ करतो आणि दुकानातील पुस्तकं लोकांचं मस्तकं स्वच्छ करतात. या अनोख्या उपक्रमाबाबत त्याच्याशी चर्चा केली असता तो सांगतो की, “केरळमध्ये एका सलून मध्ये केलेल्या अशा प्रकारच्या उपक्रमातून मला ही प्रेरणा मिळाली. मी स्वतः एम.ए.बी.एड असून मला साहित्याची आवड आहे. स्पर्धा परीक्षेत मला मजल मारता आली नाही ती संधी युवकांना मिळावी म्हणून मी अशा प्रकारचा प्रयोग केला आहे.” अनेक सलून दुकानामध्ये फ्री वाय फाय सुविधा असल्याचं आपण पाहतो. मात्र या सलूनमधील मोफत वाचनालय हे परिसरात आदर्श निर्माण झालेलं आहे.

हे ही वाचा…

याबाबत दुकानात केस कटिंग करायला आलेले रामचंद्र बंडगर सांगतात, “वाचनालये ओस पडत चाललेल्या युगात विक्रम झेंडे यांचा हा उपक्रम प्रेरणादायी आहे. या दुकानात नेहमी गर्दी असते यावेळी लोकांना वाट पाहत उभे राहावे लागते. त्या वेळेचा सदुपयोग पुस्तक वाचून करणे शकत झाले आहे. मी स्वतः गाडगेबाबा यांच्यासंदर्भात के.सी. ठाकरे यांनी लिहिलेलं पुस्तक केस कापण्यासाठी आल्यानंतर अर्ध वाचलं आहे. पुढच्या वेळी ते पूर्ण होईल.”

वाचनालयात जाऊन पुस्तकं वाचण्याची संख्या कमी होत असलेल्या काळात गर्दीच्या ठिकाणी पुस्तकं आणून लोकांना ती वाचण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या विक्रम झेंडे यांचा हा प्रयोग यशस्वी होत आहे. विक्रम यांनी बॉडी मसाज करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जागेवर हे वाचनालय थाटलेलं आहे. त्यासाठी त्यांनी बॉडी मसाज करणे बंद केलं. सामाजिक उपक्रमात केवळ आर्थिक फायदा न पाहता वैचारिक वारसा जपण्याचा विक्रमने केलेला हा उपक्रम प्रेरणादायी आहे.

हातात वस्तरा घेऊन 'तो' चालवतोय वाचन चळवळ

त्याच्या हातातील वस्तरा लोकांचे चेहरे स्वच्छ करतो तर, दुकानातली पुस्तकं लोकांची मस्तकं स्वच्छ करतात. पाहा हातात वस्तरा घेऊन वाचन चळवळ चालवणाऱ्या तरुणाची प्रेरणादायी कहाणी…#MaxMaharashtra

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई गुरुवार, 23 जनवरी 2020

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997