Home News Update  शरद पवार मुख्यमंत्री होणार का? काय म्हणाले शरद पवार

 शरद पवार मुख्यमंत्री होणार का? काय म्हणाले शरद पवार

Courtesy :Social Media
Support MaxMaharashtra

आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची राज्यातील राजकीय परिस्थिती संदर्भात भेट घेतली.

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात कधी सत्ता स्थापन होणार याकडे राजकीय वर्तुळाबरोबरच राज्यातील शेतकऱ्यांचं देखील लक्ष लागलं आहे. त्यातच आज राज्यातील दिग्गज नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही दिल्ली मध्ये आहेत.

सोनिया गांधी यांच्या भेटी नंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना आपण पुन्हा एकदा महाराष्ट्राची कमान सांभाळणार का? असा सवाल करण्यात आला होता. यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात आपण पुन्हा एकदा महाराष्ट्रात येणार नाही. असं म्हणत आपण राज्याचं नेतृत्व करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान या पत्रकार परिषदेत शिवसेनेसोबत जाणार का? असा प्रश्न विचारला असता पवार यांनी…

“शिवसेनेसोबत चर्चा नाकारता येत नाही. शिवसेनेकडून अद्याप विचारणा झालेली नाही. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून विचारणा व्हायला हवी. आम्हाला कोणाकडूनही प्रस्ताव दिलेला नाही. त्यामुळे पाठींबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,”

असं म्हणत शरद पवार यांनी शिवसेनेसोबत जाण्यासंदर्भात स्पष्ट संकेत दिले.
काय म्हणाले शरद पवार… ?

मी जे बघतोय त्यानुसार मला असं दिसतंय की शिवसेनेला त्यांच्या नेतृत्वात सरकार हवे आहे..

कुणी आम्हाला विचारलं तरी पाहिजे.शिवसेना आणि भाजपमध्ये जे सुरू आहे ते ‘केवल बार्गेनिंग गेम नाही, मुझे सिरीयस लगता है’

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997