रक्षा खडसे यांना केंद्रात मंत्री पद मिळणार का?

रक्षा खडसे यांना केंद्रात मंत्री पद मिळणार का?

‘पक्षाने केंद्रात मंत्रिपदाची संधी दिली तर आपण आनंदाने जबादारी पार पाडू’ असं मत भाजपच्या रावेर मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी मॅक्समहाराष्ट्राशी बोलतांना व्यक्त केलं आहे. रक्षा खडसे ह्या दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे राज्यात महिला उमेदवारात सर्वाधिक मतं रक्षा खडसेंना मिळाले आहेत. रक्षा खडसे ह्या भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, भाजपच्या पूनम महाजन, प्रीतम मुंडे, डॉ हिना गावीत, तसंच भारती पवार यांच्या पेक्षाही सर्वाधिक मताधिक्याने रक्षा खडसे निवडून आल्या आहेत.