तिवरे धरण का फुटलं ? ऐका निवृत्त अभियंता विजय पांढरेकडून

तिवरे धरण का फुटलं ? ऐका निवृत्त अभियंता विजय पांढरेकडून

554
0
रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून १७ जणांचा दुर्देवी मृत्यु झाल्याची दुर्घटना घडल्यानंतर राज्यात हाहाकार उडालाय. 20 वर्षांपूर्वी बांधलेले हे धरण नादुरुस्त असल्याची टीका सुरू झालीय. मात्र, जलसंपदा विभागातील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या विजय पांढरे यांनी या धरणाबाबत पहिल्यांदाच मत व्यक्त केलंय.
तिवरे धरण बांधतांना त्याच्या गाभ्यात काळी माती नसल्यानं हे धरण फुटलं असावं, अशी शक्यता जलसंपदा विभागाचे माजी अधीक्षक अभियंता विजय पांढरे यांनी वर्तवलीय. रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. मुळात या धरणांची गरज होती काय, आणि गरज होती तर मग यामध्ये तांत्रिक बाबी तपासल्या गेल्यात काय ? असे अनेक प्रश्न आणि धक्कादायक बाबी समोर येत आहेत. जलसंपदा विभागात अधीक्षक अभियंता राहिलेले विजय पांढरे यांनी कोकणातील धरणांची स्थिती आणि धरण बांधण्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक बाबी स्पष्ट केल्या आहेत.