सरकारसाठीचे प्रश्न पवारांना का विचारतो मिडिया ?

सरकारसाठीचे प्रश्न पवारांना का विचारतो मिडिया ?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रविवारी माण, खटाव या सातारा तालुक्यातील दुष्काळी भागात दौरा केला. शेतक-यांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या मागण्या समजून घेतल्यानंतर पवार यांनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला. मात्र, यावेळी एका वृत्त वाहिनीच्या पत्रकारानं पवारांना विचारलं की, लोकांना टॅकरमुक्त माण हवाय ?  कधी होणार माण टॅकरमुक्त. पवारांनी या प्रश्नावर काय उत्तर दिलं ते आपण पाहूच.. मात्र, राज्यात सत्ताधारी असलेल्या नेत्यांची आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे दुष्काळापासून जनतेला सावरण्याची. त्यासाठी सरकारी यंत्रणानी तात्कालिक उपाययोजनांसोबतच दीर्घ मुदतीच्या उपाययोजनांचाही विचार करणे आणि त्या राबवणे आवश्यक असते. मात्र, याबाबतचा प्रश्न सरकारी पक्षाला अथवा मंत्र्यांना न विचारता विरोधी पक्षात असलेल्या शरद पवार यांना विचारून पत्रकारांनी काय साध्य केले ?

या प्रश्नाचं उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, ठीक आहे लोकांची टॅकरची मागणी असताना तुम्हाला टॅकरमुक्त तालुका हवाय तर मी लोकांना सांगतो की टॅकर बंद करा. कारण या पत्रकारांनी सांगितलंय की टॅकरची गरज नाही.

पवारांनी सध्या तात्कालिक उपाययोजना करून या परिस्थितीत जनतेला कसा दिलासा देता येईल, यासाठी प्रयत्न चालवले आहेत. मात्र, दीर्घ उपाययोजनांसाठी  प्रश्न सरकारला का विचारले नाहीत. तेवढी हिम्मत पत्रकार दाखवणार नाहीत का?  हा खरा प्रश्न आहे.