Home मॅक्स ब्लॉग्ज इंदोरच्या समस्या मांडण्यासाठी सुमित्रा महाजनांना काँग्रेसचा आधार !!!

इंदोरच्या समस्या मांडण्यासाठी सुमित्रा महाजनांना काँग्रेसचा आधार !!!

377
0
Support MaxMaharashtra

मध्यप्रदेशात शिवराज चौहान(Shivraj Chouhan) यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचं (BJP)सरकार असताना इंदोरच्या माजी खासदार व माजी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन (Sumitra Mahajan) यांची स्वत:च्याच सरकारविरोधात बोलायची अडचण असायची. अशा वेळी त्या काँग्रेसचा आधार घेत होत्या. जितू पटवारी आणि तुलसी सिलावट या काँग्रेस आमदारांमार्फत त्या आपल्या मतदारसंघातील समस्यांबाबत आवाज उठवायचा. स्वत: सुमित्रा महाजन यांनीच हा गौप्यस्फोट केलाय. मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांच्या अध्यक्षतेखालील एका कार्यक्रमात महाजन बोलत होत्या.

सुमित्रा महाजन इंदोरहून आठ वेळा खासदार राहिल्या आहेत. महाजन यांचं म्हणणं असं की त्यांनी पक्षांकडे तिकीट कधीच मागितलं नाही. प्रत्येकवेळी पक्षाने त्यांना स्वत:हून तिकीट दिलं.

हे ही वाचा…

सामाजिक परिवर्तनाची सुरूवात स्वतःपासून हवी : जयश्री जगदाळे

राजकीय, कायदेविषयक व संवैधानिक मुद्दे आणि समर्थकांचे भावनिक होणे!

शेंडी, जानव्यातलं हिंदुत्व मला मान्य नाही !! असं मुख्यमंत्री खरंच म्हणालेत का?

पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना शेवटपर्यंत प्रतिक्षा करावी लागली. मोदी-शहा जोडीने पध्दतशीरपणे ज्या दिग्गजांची तिकिटं कापली, त्यात सुमित्रा महाजन ही होत्या. पक्षशिस्त म्हणून त्या निवडणुकीवेळी गप्प राहिल्या, पण आता त्यांचा असंतोष अप्रत्यक्षरीत्या बाहेर आला आहे.

महाजन कार्यक्रमात म्हणाल्या की पक्षाचंच सरकार असल्यामुळे माझी अडचण होत होती. पण इंदोरचा विकास महत्त्वाचा होता. त्यासाठी मला राजकारणापलिकडे जाऊन विचार करावा लागला. मी जितू (पटवारी) आणि तुलसी (सिलवाट) यांना सांगायची की तुम्ही आवाज उठवा, मी मुख्यमंत्र्यांना सांगून काम करून घेईन.

महाजन यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस भाजपावर हल्ला न चढवण्याची संधी न घेते, तरच नवल होतं. ” मोदी सरकारच्या तानाशाहीने सुमित्रा महाजन व्यथित होत्या. जनतेचे प्रश्नही त्या पक्षीय मंचावर मांडू शकत नव्हत्या. त्यासाठी त्यांना काँग्रेसचं सहकार्य लागे. हे भय नाही तर काय आहे?” असं ट्वीट काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी केलंय.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997