Home जनतेचा जाहीरनामा नेते फक्त मतदान कार्ड काढून देण्यासाठी तत्पर असतात…

नेते फक्त मतदान कार्ड काढून देण्यासाठी तत्पर असतात…

निवडणूकीचा काळ सुरु आहे. त्यामुळे नेते ज्या गल्लीत कधीही गेले नसतील अशा गल्लीत सध्या मतांचा जोगवा मागण्यासाठी जात आहे. पुण्यातील फुले वस्ती राहणाऱ्या जनतेशी मॅक्समहाराष्ट्रच्या टीमने संवाद साधला.

Support MaxMaharashtra

३० वर्षापासून इथल्या वस्तीत हे नागरीक राहतात. यात खासकरुन भटके विमुक्त समाजातील लोक आहेत. या वस्त्यात राजकीय नेते जातात आणि या नागरीकांचे मतदान कार्ड काढतात. मात्र, जेव्हा हे लोक पुन्हा या नेत्यांकडे नागरीकत्वाचे पुरावे काढण्यासाठी जातात. तेव्हा त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली जातात.

त्यामुळे इथल्या लोकांना मतदान तर करता येते. मात्र, त्यांना सरकारी सुविधा त्यांचे हक्क, मिळत नाहीत. लाईट पाणी या सारख्या सुविधा बरोबरच या देशाच्या नागरिकत्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी असंख्य खेट्या मारव्या लागत आहे. पाहा काय आहे येथील जनतेच्या भावना…

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997