Home News Update अमेझॉनवर मोदी सरकार नाराज का?

अमेझॉनवर मोदी सरकार नाराज का?

136
Amazon Founder Jeff Bezos
Support MaxMaharashtra

अमेझॉनचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांनी नुकताच भारताचा दौरा केला. तीन दिवसाच्या या दौऱ्यात जेफ बेझोस भारतीय उद्योगपती, बॉलीवूडच्या कलाकारांना भेटले. भारतात १ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा बेझोस यांनी केली. मात्र त्यांच्या घोषणेला केंद्र सरकारने थंड प्रतिसाद दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेझोज यांना भेट नाकारली.  जेफ बेझोस यांच्या मालकिचं ‘वॉशिंग्टन पोस्ट’ हे जगातलं आघाडीचं आणि प्रभावशाली वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्रानं नेहमीचं मोदी आणि सरकारच्या ध्येयधोरणावर टिका केलीये. त्यामुळे हे प्रकरण नेमक काय आहे ते समजून घेवूयात.

‘वॉशिंग्टन पोस्ट’वर भाजप नाराज का ?

जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवणे, सुधारीत नागरीकत्व कायद्यावरुन ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने सातत्यानं मोदी सरकारवर टिका केलीये. ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या संपादकीय लिखाणावरुन भाजप सरकार नाराज आहे. ’वॉशिंग्टन पोस्ट’ हे जगातील एक प्रभावी वृत्तपत्र आहे. ‘ग्लोबल ओपीनीयन मेकर’ असही या वृत्तपत्राला म्हटलं जात. त्यामुळे ‘पोस्ट’च्या टिकेमुळे मोदींची जगभरात प्रतिमा वाईट होत असल्याची भिती भाजपला वाटतेय. जेफ बेझोस यांनी ‘वॉशिंग्टन पोस्ट’ला २०१३ मध्ये विकत घेतल. त्यामुळे भारतातील ई कॉमर्सची मोठी बाजारपेठ बघता, बेझोस यांनी मोदी सरकारच्या ध्येयधोरणावर टिका करु नये असं भाजपला वाटतं. दूसरीकडे मोदी यांची प्रखर टिकाकार, महिला पत्रकार राणा अयूब यांना ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने नियमित स्तंभलेखक म्हणून नियुक्त केलंय. राणा अयूब यांनी शोधपत्रकारितेच्या माध्यमातून लिहीलेल्या ‘गुजरात फाईल्स’ या पुस्तकाद्वारे मोदी सरकारने गुजरातमध्ये कशा दंगली घडवल्या याचे सविस्तर पुरावे मांडले आहेत. राणा अयूब यांनी स्तंभलेखनातून वांरवार मोदी सरकारवर टिका केली आहे. वर्षभरापुर्वी इस्तंबूलच्या दूतावासात मारला गेलेला सौदी अरेबीयाचा पत्रकार जमाल खशोगी हा देखील ‘वॉशिंग्टन पोस्ट’चा स्तंभलेखक होता.

भाजप नेत्यांनी बेझोस यांच्यावर काय टिका केली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेझोस यांना भेटीसाठी वेळ दिली नाही. भाजपच्या मंत्र्यानीही बेझोस यांना भेटणे टाळलं. त्यामुळे केंद्र सरकारने एक प्रकारे जेफ बेझोस यांना कडक संदेश दिलाय. भारतात गुंतवणूक करुन बेझोस यांनी काही उपकार केले नाही. त्यांनी नियम आणि कायद्याचं पालन करावं, या शब्दात उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी टिका केलीये. तर भाजप नेते विजय चौथाईवाले यांनी गेल्या दोन महिन्यापासून ‘वॉशिंग्टन पोस्ट”ने पाकिस्तानविषयी एकही नकारात्मक वृत्त प्रकाशित केलं नसल्याची टिका केली आहे. जेफ बेजोस यांनी ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या कर्मचाऱ्यांना भारताविषयीचा दृष्टीकोण विचारावा असा सल्लाही त्यांनी बेझोस यांना दिला.

बेझोस यांच्या  घोषणा

बेझोस यांनी भारतात १ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. २०१४ पासून बेझोस यांनी आतापर्यंत देशात साडे पाच अब्ज डॉलरची गुंतवणूक केलीये. अमेजॉन देशातील १०० शहरं आणि खेड्यांमध्ये ‘डिजीटल हाट’ उभारणार आहे. त्यामुळे १ कोटी उत्पादकांना त्यांच उत्पादन विक्रीसाठी ई प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल. या माध्यमातून २०२५ पर्यंत अमेझॉनने १० अब्ज डॉलरपर्यंत निर्यातीचं उद्दीष्ट डोळ्यापुढं ठेवलं. शिवाय १० लाख भारतीयांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचं बेझोस यांनी म्हटलंय.

भारतीय व्यापाऱ्यांचा अमेझॉनला विरोध का?

अमेझॉन आणि वॉलमार्टमुळे भारतातल्या लघू, मध्यम किराणा व्यापाऱ्यांचं नूकसान होत आहे. उत्सवाच्या काळात या दोन कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट आणि ऑफर दिल्या. त्यामुळे उत्पादकांचं मोठ नूकसान झालं. या कंपन्या ठरावीक उत्पादकांकडून माल खरेदी करतात. असा आरोपही या व्यापाऱ्यांनी लावलाय.
अमेझॉन आणि फ्लिपकार्टमुळे उत्पादक, व्यापाऱ्यांना काही फायदा होत नाही. केवळ डिलीव्हरी बॉयचे रोजगार वाढलेत. असा आरोपही व्यापाऱ्यांचा आहे. या कंपन्या ८० टक्के माल चीनवरुन आयात करतात. आणि तो भारतात विकतात. काही स्थानिक उत्पादकांकडून माल खरेदी केला जातो. मात्र त्याचं कमिशन जास्त आहे,असाही आरोप या संघटनांचा आहे.

ई- कॉमर्स मार्केटमध्ये भारताचं महत्व ?

ई- कॉमर्स क्षेत्रात भारत एक मोठी बाजारपेठ आहे. देशात ई- कॉमर्स उलाढाल या वर्षी १२० अब्ज डॉलरवर पोहोचणार आहे. २०१७ ते २०२० या वर्षात ऑनलाईन विक्रीत ५१ टक्याने वाढ झालीये. त्यामुळे जगभरातील मोठ्या कंपन्यांची नजर भारतावर आहे. हे लक्षात घेवून रिलायंसचे मुकेश अंबानी यांनी जिओ मार्केट क्षेत्रात उतरण्याची घोषणा केली आहे. दूसरिकडे भारतानं देशाअंतर्गत व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही कडक नियम तयार केलेत.

‘वाशिंग्टन पोस्ट’ची पत्रकारिता

१८७७ मध्ये ‘वॉशिंग्टन पोस्ट’ची स्थापना झाली. या वृत्तपत्राचे जगभरात ब्युरो कार्यालय आहेत. शोध पत्रकारीता, प्रामाणिक, वस्तुनिष्ठ पत्रकारीतेसाठी हे वृत्तपत्र ओळखलं जात. दर्जेदार पत्रकारितेसाठी आतापर्यंत वॉशिंग्टन पोस्टच्या पत्रकारांनी ४४ पुलित्झर पुरस्कार जिंकले आहेत. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना ‘वॉटरगेट’ प्रकरणात पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. वॉशिंग्टन पोस्टच्या बॉब वुडवर्ड, बेन्जामिन ब्रॅडली या पत्रकारांनी हे प्रकरण शोधून काढलं होत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुध्दही शोधपत्रकारितेच्या माध्यमातून अनेक ब्रेकींग न्यूज, अहवाल ‘पोस्ट’ने’ प्रकाशित केलेत. त्यामुळे ट्रम्प सातत्याने ‘वॉशिंग्टन पोस्ट’वर’ कायम टिका करत असतात. २०१३ मध्ये बेझोस यांनी हे वृत्तपत्र खरेदी केलं. या वृत्तपत्राचे मालक आजपर्यंत अनेकदा बदलले, मात्र संपादकीय पॉलीसी आजपर्यंत कधीचं बदलली नाही. त्यामुळे या वृत्तपत्राचा दरारा आजही कायम आहे.

‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या मोदी सरकारविरोधातल्या हेडलाईन्स

  • ३ मे २०१९- मोदींना मोठ्या संख्येने कट्टर हिंदूनी मतदान केलंय. मोदींच्या अजेंड्यात हिंदुत्ववादाला प्राधान्य
  • ६ ऑगस्ट २०१९- कलम 370 हटवणे असंवैधानिक
  • १३ नोव्हेंबर २०१९- नरेंद्र मोदी भारताचे ” डोनाल्ड ट्रंप’ आहेत
  • १९ डिसेंबर २०१९- CAA मुळे भारतीय लोकशाही धोक्यात आली आहे.
  • २३ जानेवारी २०१९- सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात देश उभा झाला.मोदींनी ऐकायला हवं

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997