Home News Update सरकार आंदोलन करणाऱ्या नागरिकांवरती पाळत ठेवतंय – प्रा.श्रीरंजन आवटे

सरकार आंदोलन करणाऱ्या नागरिकांवरती पाळत ठेवतंय – प्रा.श्रीरंजन आवटे

226
0
Support MaxMaharashtra

इस्त्राईल स्पायवेअर च्या माध्यमातून भारतासह जगभरातील नागरिकांवर आणि महत्त्वाच्या पत्रकारांवर पाळत ठेवली जात असल्याचं समोर आलं आहे. या संदर्भात प्रा.श्रीरंजन आवटे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.

या संदर्भात बोलताना प्रा.श्रीरंजन आवटे यांनी… जॉर्ज यांच्या कांदबरी मधल्या ‘बिग ब्रदर इज वॉचिंग यू’ प्रमाणे तुम्ही काय करत आहात? तुम्ही काय खाताय? तुम्ही काय पिताय? तुम्ही कुठे फिरताय? या सगळ्यांची माहिती गोळा केली जात असल्याचं सांगितलं.
2016 मधल्या अमेरिकेच्या निवडणुकीत केंब्रिज अनालीटीका या संस्थेमार्फत व्यक्तिगत माहिती गोळा करण्यात आली आणि ही माहिती वेगळ्या प्रकारे वापरण्यात आली. या माहितीच्या आधारेच माहितीच्या आधारेचं डोनाल्ड ट्रम्प निवडून आले. असं मत आवटे यांनी यावेळी व्यक्त केलं.

इंडियन एक्सप्रेस ने दिलेल्या वृत्तानुसार केंब्रिज केवळ व्यक्तीचे 8.2 डाटा पॉईंट चोरतंय. तर दुसरीकडे भारतातील ‘नमो ॲप’ नागरिकांचे 22 डाटा पॉईंट चोरत आहे.
राईट टू प्रायव्हसी ही संकल्पना जवळजवळ संपल्यात जमा आहे. राज्यसंस्था प्रत्येक ठिकाणी हस्तक्षेप करत आहे तुम्ही काय खायचं? तुम्ही काय प्यायचं? तुम्ही कुठे फिरायचं? या सर्व गोष्टींवर सरकारचा हस्तक्षेप वाढतोय. हे अत्यंत घातक आहे. असं मत प्रा.श्रीरंजन आवटे यांनी व्यक्त केलं.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997