Home Election 2019 “मी बारामतीला चाललोय” – अजित पवार

“मी बारामतीला चाललोय” – अजित पवार

ajit pawar
Support MaxMaharashtra

आज राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्यामध्ये होणाऱ्या समन्वय समितीच्या बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी सुरुवात झाली. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार बैठक सोडून अचानक बाहेर आले.

माध्यमांनी त्यांना विचारले असता, त्यांनी “नो कमेंट्स, नो कमेंट्स. मी बारामतीला चाललोय” असं रागात उत्तर दिलं. त्यांच्या चेहऱ्यावर राग दिसत होता. मात्र, यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील होते. ते देखील माध्यमांशी काहीही बोलले नाही.

महाशिवआघाडी टिकणार का?
वाटाघाटीबद्दल योग्यवेळी योग्य बैठका होतील – बाळासाहेब थोरात
काय घडतंय महाशिवआघाडीत? उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

माध्यमांवरती समन्वय समितीच्या बैठकीत खोडा बसल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या संदर्भात ट्विट करुन हे वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान शरद पवार यांनी देखील या वृत्ताचं खंडन केलं आहे. अजित पवार कुठेही गेलेले नाहीत. माध्यमांसमोर ते चेष्टेनं म्हणालेत. तुमच्या अशा मागे धावण्यानं काही प्रायव्हसी उरत नाही, त्यासाठी ते असं म्हणाले असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

त्यानंतर काही वेळानं अजित पवार यांच्यासह समन्वय समितीच्या झालेल्या बैठकीचा फोटो कॉंग्रेसच्या अधिकृत संपर्क अधिकाऱ्यांनी माध्यमांना पाठवला.

या सगळ्या घडामोडीमध्ये अजित पवार यांच्या देहबोलीचा विचार करता आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं वातावरण दिसत आहे. त्यातच अजित पवारांच्या जे ओटावर असतं तेच त्यांच्या मनात असतं. त्यामुळं अजित पवार का नाराज झाले? हा विषय सध्या माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला जात आहे.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997