Home max political मुंबईतील मुस्लिमांच्या प्रचंड गर्दीच्या फोटोमागचं सत्य काय?

मुंबईतील मुस्लिमांच्या प्रचंड गर्दीच्या फोटोमागचं सत्य काय?

935
Support MaxMaharashtra

मुंबईत नागरिकता विधेयकाच्या विरोधात मुस्लिमांची एक महाप्रचंड रॅली निघाली, याबाबतचे फोटो समाज माध्यमात झळकू लागले आहेत. मोहम्मद अली रोडवरील एका पुलाखाली मुंगीलाही जागा राहणार नाही, अशी गर्दी या फोटोत दिसते. व्हाट्सअप समुहात या फोटोखाली “हे खरं आहे का” अशाप्रकारची विचारणा होऊ लागली आहे.

मुंबईतील मोहंमद अली रोडवरील गर्दीचा म्हणून प्रसारित झालेल्या या फोटोचा शोध घेतला असता, सर्वगया सिंग या हिंदुत्ववादी विचारांच्या ट्वीटर अकाऊंटवर तो १४ डिसेंबर, २०१९ रोजी दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी पोस्ट झालेला दिसतो. सर्वगया सिंग यांच्या अकाऊंटवर हिंदू-मुस्लिमांत ताणतणाव निर्माण करू शकतील, अशा मुस्लिमांना लक्ष्य केलेल्या कित्येक पोस्ट आढळतात. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या कार्यालयाने सिंग यांचं अकाऊंट फाॅलो केलं आहे. “युपीत असे जमून दाखवा”, असा मजकूर सिंग यांनी फोटो सोबत जोडलाय. सीएम जिगरवाला पाहिजे, अशी पुस्तीही सिंग यांनी जोडलीय.

हाच फोटो श्रवण जैन यांच्या अकाऊंटवर १४ डिसेंबरलाच सायंकाळी ६ वाजता ट्वीट झालेला दिसतो. आपण बॅग निर्माते असल्याची माहिती जैन यांनी दिलीय. नाॅट फाॅलोड बाय एनीवन म्हणणाऱ्या जैन यांचं अकाऊंटही हिंदुत्ववादी विचारसरणीचं असल्याचं त्यांच्या पोस्टस् वरून दिसून येतं. ” ही गर्दी बघून लोकसंख्या नियंत्रण कायदा का यायला हवा, ते लक्षात येतं, अशा आशयाचा मजकूर श्रवण जैन यांनी फोटोसोबत दिलाय.

१२ नोव्हेंबर, २०१९ रोजी हाच फोटो Rariya या फेसबुक पेजवर पोस्ट झालेला होता. तोच फोटो balarbe ladan hunkuyi या फेसबुक अकाऊंटवरून नोव्हेंबर महिन्यात शेअर झालेला सापडतो. https://m.facebook.com/story.php?story_fbid=2504338459664569&id=208430435922061&sfnsn=scwspmo&extid=ZVLGnZL8AbxgaVqy ही त्या पोस्टची लिंक आहे. फोटोसोबतचा मजकूर अज्ञात भाषेत असल्याने गुगल ट्रान्सलेशनचा आधार व त्यानंतर मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सदरचा फोटो प्रेषित मोहंमद यांच्या जन्मोत्सवाच्या नायजेरियातील मिरवणुकीचा असल्याचं स्पष्ट होतं.‌

शिवाय, मुंबईत पायधुनी पोलिस ठाण्याशी मॅक्समहाराष्ट्र ने संपर्क साधला असता, नागरिकता विधेयकावरून त्या भागात गेल्या दोन-तीन दिवसांत कोणतीही रॅली निघाली नसल्याचं सांगण्यात आलं.

यावरून, मुस्लिम समाज नागरिकता विधेयकाविरोधात प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरल्याचं दाखवणारा मुंबईतील मोहंमद अली रोडवरील गर्दीच्या फोटोचा दावा सपशेल खोटा असल्याचं स्पष्ट होतं.‌

 

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997