Home मॅक्स ब्लॉग्ज नैतिक अहंगंडातून राजकीय सत्तेकडे बघू नका !

नैतिक अहंगंडातून राजकीय सत्तेकडे बघू नका !

262
0
Courtesy : Social Media
Support MaxMaharashtra

शासन म्हणते “त्या गुलाबी रंगाच्या कागदाच्या तुकड्याचे आजपासून मूल्य २००० रुपये”; आणि आपण त्याच्या साहाय्याने सारे व्यवहार करायला लागतो.

शासन म्हणते “या सडपातळ शरीरयष्टीच्या ट्रॅफिक पोलिसाचे हायवेवरच्या हजारो वाहन चालकांनी ऐकायचे, आणि कोट्यवधी रुपयांच्या कारचे श्रीमंत ड्रायव्हर देखील त्याचे ऐकतात. शासन म्हणते अमुक एक कंपनीवर कर नाही; तमुक प्रकल्पाला आम्ही जमीन स्वस्तात देऊ; आणि ती तोट्यातील कंपनी / तो प्रकल्प किफायतशीर मानला जाऊ लागतो.
लग्न हा १०० टक्के तुमचा खाजगी निर्णय असतो; पण शासन ठरवते कोणत्या औपचारिकता पूर्ण केल्यावरच त्याला वैध मानायचे.

हे ही वाचा…

वाडिया रुग्णालयासाठी शासनाकडून २४ कोटी रुपये

‘जाणता राजा’ वादावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

छत्रपती आणि भाजपच्या उचापती !

सत्तेच्या राजकारणापासून तुम्हाला दूर राहायचे तर रहा. पण सत्तेवर नक्की कोण येणार? टिकणार याबद्दल तुम्ही इंडिफ्फरंट / “मला काही फरक पडत नाही” राहू शकत नाही. असं म्हणणं तुम्हाला ते महागात पडेल.

जीवनात पहिल्यांदा सामाजिक / राजकीय मुद्यावर हिरीरीने सहभागी होणाऱ्या माझ्या तरुण मित्र / मैत्रिणींना सलाम ! तुम्हीच आपल्या देशाचा भविष्यातील आकार उकार ठरवणार आहात ! पण वरील काही पुरातन तत्वांवर आतापासूनच आपापसात चर्चा करा, मनन, चिंतन करा !

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997