Home मॅक्स ब्लॉग्ज “मोरॉल इकॉनॉमी” म्हणजे काय?

“मोरॉल इकॉनॉमी” म्हणजे काय?

208
0
Courtesy : Social Media
Support MaxMaharashtra

अर्थव्यवस्था कशी चालावी? याबद्दल एक विचारव्यूह मानतो की सर्वकाही मार्केटवर सोपवावे; त्याच्या परिणामाची चिंता करू नये. काही जेते असतील काही हरतील. दुसरा विचार अशी मांडणी करतो की अर्थव्यवस्था “मन्युष्यकेंद्री” असावी, त्यात वस्तुमाल / सेवांचे न्याय्य वाटप अनुस्यूत असावे.

आर्थिक विचारात डाव्या व उजव्यांमध्ये झालेली विभागणी अलीकडची आहे. पण वस्तुमाल उपलब्ध कसा करावा, श्रमविभागणी कशी असावी, उपभोग्य मालाचे वाटप कसे करावे? याच्या मानवी मनातील चिंता पार टोळी युगापासूनच्या आहेत.

कोणाची राजकीय विचारसरणी काय? हा मुद्दा क्षणभर बाजूला ठेवला आणि खालील प्रश्न विचारले तुम्हाला समाजातील बालमृत्यू, दारिद्र्यामुळे लहान मुलांना काम करावयास लागणे, काही सपोर्ट नसल्यामुळे म्हाताऱ्या स्त्रीपुरुषांना लाजिरवाणे जिणे जगावे लागणे (असे अनेक प्रश्न) मान्य आहे का ?

बहुसंख्य नागरिक “नाही” असे उत्तर देतील. याचे कारण मी असे मानतो की समाजात बहुसंख्य नागरिक विचारी व संवेदनशील असतात; जो विचारीपणा व संवेदनशीलता त्यांच्या औपचारिक राजकीय विचारसरणीच्या पेक्षा खूप प्राचीन आहे.

वरील अनेक गोष्टी पाहून, ऐकून ते विद्ध होत असतात; त्यांना गोष्टी खटकतात, जेन्युइनली खटकतात. मला हे महत्वाचे वाटते. आजुबाजूचा अमानवीपणा बंद होण्यासाठी ते सक्रियपणे काही करीत नाहीत. याचा अर्थ ते अविचारी आणि असंवेदनशील आहेत. असा निष्कर्ष काढण्याची गरज नाही.

प्रश्न असा विचारला पाहिजे की, सामुदायिक सामाजिक मनात गेली हजारो वर्षे खोलवर रुजलेली “अर्थव्यवस्था काही एक नीतितत्त्वांवर चालावी” (मॉरल इकॉनॉमी) ही भावना आपल्या राजकीय निर्णय प्रक्रियेत का प्रतिबिंबित होत नाही अर्थव्यवस्था अधिक मनुष्यकेंद्री करण्यासाठी या खोलवरच्या भावना ढकलशक्ती का बनत नाहीत ? तेथे असे लक्षात येते कि गेली काही शतके त्यांच्यासमोर प्रेझेंट केले गेलेले विचारव्यूह त्यांना त्यापासून मागे खेचत असतात . उदा

(१) नीतिकारक अर्थव्यवस्थेसाठी प्रथम नैतिक व्यक्ती (म्हणजे भ्रष्टाचारी नसणाऱ्या वगैरे) तयार व्हायला हव्यात.

(२) अर्थव्यवस्था चालवण्याचे नियम (उदा अर्थव्यवस्थेत सरकारने हस्तक्षेप करू नये किंवा झिरपा सिद्धांत किंवा प्रत्येकाला त्याच्या लायकीप्रमाणे राहणीमान मिळते इत्यादी) गुरुत्वाकर्षाणासारख्या नैसर्गिक नियमांप्रमाणे आहेत; त्यात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही अशी त्यांची ठाम धारणा असते.

मनुष्यकेंद्री अर्थव्यवस्था तयार करण्यासाठी “अर्थव्यवस्था काही एक नीतिमूल्यांवर आधारित असावी (मोरॉल इकॉनॉमी)” या जनमानसात रुजलेल्या प्राचीन भावनेच्या ज्योतीला पुन्हा एकदा फुंकर घालून मोठी करण्याची गरज आहे. म्हणून राजकीय अर्थव्यवस्था नक्की कशी चालते याचे शिक्षण खूप महत्वाचे आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997