Home Election 2020 ‘राजकारण आणि समाजकारणातून शरद पवारांना कायमची निवृत्ती देणार’

‘राजकारण आणि समाजकारणातून शरद पवारांना कायमची निवृत्ती देणार’

‘विधानसभा निवडणुकीनंतर राजकारण आणि समाजकारण यातून शरद पवार यांना कायमची निवृत्ती देणार’ असं वक्तव्य भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. राधानगरी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत चंद्रकांत पाटील उपस्थित होते. सोबतच ” मी कोथरुडमधून निवडून येणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही” असा विश्वासही पाटील यांनी दाखवला.

बहुचर्चित अशा कोथरुड मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसनं आपला उमेदवार मागे घेत मनसेच्या उमेदवारास जाहीर पाठींबा देण्यासंर्दभात बोलताना ” मला कोथरुडमध्ये अडकवून ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना साधा उमेदवार देता आला नाही त्यावरुन त्यांच्या पक्षांची ताकद किती उरली आहे ते कळून येतं” असा टोला लगावला आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997