Home News Update उभे राहा आणि वजन कमी करा – वंदना ल्युथरा

उभे राहा आणि वजन कमी करा – वंदना ल्युथरा

Support MaxMaharashtra

आपल्या दैनंदिन जिवनातील ताण-तणाव आणि अनियमित जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या वजनाला आळा घालण्यासाठी स्त्री-पुरुषांच्या पुढे अनेक अडचणी येतात. मात्र, केवळ दिवसातून दोन तास उभे राहिल्यानं आपले वजन कमी होऊ शकते. अगदी लोकल प्रवासातील उभं राहण्याची अपरिहार्यताही आपले वजन कमी करू शकते. असा दावा व्ही एल सी सी च्या अध्यक्ष वंदना ल्युथरा यांनी केला आहे. व्हीएलसीसीने लठ्ठपणाविरूद्ध आपली जनजागृती मोहीम सुरू करण्याची घोषणा वंदना ल्युथरा यांनी केली आहे.

भारतीयांच्या जीवनातील हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्ही एल सी सी च्या माध्यमातून लवकरच स्टॅंडअप इंडिया ही मोहीम येत्या 26 नोव्हेंबर पासून राबवणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे. लोकांना आपल्या लठ्ठपणामुळे विविध आजार आणि अडचणींना सामोरे जावे लागतं, त्यासाठी उभे राहणे हा उत्तम उपाय असल्याचे त्या म्हणाल्या, केवळ आहाराची पध्दती आणि पदार्थ बदलून अथवा टाळून चालणार नाही. साखर, तेल तुप टाळले तरी खूप फरक पडेल असेही त्या म्हणाल्या. यासाठी शाळांमधून आणि पालकांच्या जागृतीने ही मोहीम राबवली जाणार आहे.

व्ही एल सी सी चे भारत आणि नेपाळमध्ये 96 व्हेलनेस सेंटर असून महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये 37 सेंटर्स आहेत तर येत्या वर्षभरात महाराष्ट्रात आणखी आठ ठिकाणी सेंटर उभारले जाणार आहेत. यात यवतमाळ, धुळे, रत्नागिरी, नांदेड, वाशिम, कोल्हापूर, लातूर, अहमदनगर, सातारा,वर्धा आणि सोलापूर याठिकाणी सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. तर महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई येथे सहा प्रशिक्षण केंद्रे असून आणखी 5 प्रशिक्षण केंद्रे सुरु करण्याचा व्ही एल सी सी चा मानस आहे.

आतापर्यंत 2000 विद्यार्थी शुल्क आकारून तर 1000 विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण शासकीय संस्थेच्या माध्यमातून देण्यात आल्याचे वंदना यांनी सांगितले. त्यासाठी आता नाशिक, नागपूर, औरंगाबाद, मुंबई आणि पुणे येथे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार आहेत.

ब्युटी आणि वेलनेस इंडस्ट्रीला भारतासह महाराष्ट्रात मोठया प्रमाणात भविष्य असून या उद्योगात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती आणि स्वास्थ्याची जागृती करण्याची क्षमता असल्याचा दावाही वंदना यांनी यावेळी केला, गेल्या काही वर्षांत या उद्योगाने 12 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढ केल्याचे त्यांनी सांगितले.

उभे राहा आणि वजन कमी करा – वंदना ल्युथरा#maxmaharashtra #VLCC #Vandana_Luthra

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई बुधवार, 13 नवंबर 2019

 

 

 

 

 


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997