विराट कोहली फोर्ब्सच्या यादीत नाव असलेला एकमेव क्रिकेटपट्टू

विराट कोहली फोर्ब्सच्या यादीत नाव असलेला एकमेव क्रिकेटपट्टू

लंडन – टीम इंडीयाचा कर्णधार विराट कोहली याचं फोर्ब्सच्या खेळाडूंच्या यादीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडू म्हणून नाव समाविष्ट करण्यात आलं आहे. फोर्ब्सने नुकतीच खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
खेळाडूंच्या टॉप-१०० च्या यादीत नाव असणारा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा एकमेव क्रिकेटपटू बनला आहे. या यादीत त्याचे नाव १०० व्या क्रमांकावर आहे. जून 2018 ते जून 2019 पर्यंत त्यांची कमाई 173.5 कोटी रुपये आहे. मागील यादीत कोहली नाव 83 व्या स्थानावर होता. मात्र, आता तो 100 व्या स्थानावर पोहोचलाय.
फोर्ब्सनं दिलेल्या माहितीनुसार विराट कोहलीची सर्वाधिक कमाई क्रिकेट पीचबाहेरची आहे. कोहली हा प्युमा, पेप्सी, ओकले यासारख्या बड्या ब्रॅण्डचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे. फोर्ब्सच्या यादीमध्ये एनबीएच्या 40 खेळाडूंचा समावेश आहे. सात वर्षांमध्ये मेवेदर चार वेळा पहिल्या क्रमांकावर आहे.