Home मॅक्स रिपोर्ट परभणी : ‘आरोग्य सुविधा न देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कापा !’

परभणी : ‘आरोग्य सुविधा न देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कापा !’

118
0
Support MaxMaharashtra

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोसळणाऱ्या धो धो पावसामुळे शेतकऱ्यांच नुकसान झालं आहे. त्याचबरोबर मुसळधार परतीच्या पावसाने ग्रामीण भागात घाणीचं साम्राज्य वाढलं आहे. परभणी जिल्ह्यासह शहरात मोठ्या प्रमाणात संसर्गजन्य आजाराच्या प्रार्दुभावाने उचल खाल्ली आहे.

जिल्ह्यासह नागरी भागात डेंग्यू सदृश्य तापीचा आजारानं नागरिक मोठ्या प्रमाणात बाधित झाल्याचं पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत परभणी शहर महानगरपालिकेच्या शहरी आरोग्य व्यवस्थेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

परभणी जिल्ह्यात तापीचा रुग्णांचा इंडेक्स साडे सात टक्क्यांनी वाढला असल्याचं समोर आलं आहे. डेंग्यू फ़िवर व व्हायरल तापीच्या साथीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाय योजनांच्या बाबत शहरी आरोग्य व्यवस्थेअंतर्गत चालवण्यात येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या असता, जायकवाडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र अपवाद वगळता परभणीतील साखला प्लॉट, वर्मा नगर, इनायत नगर व शंकर नगर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नियोजित वेळेला उघडण्यातच येत नसल्याचं समोर आलं आहे.

परभणी मनपाच्या वतीनं नागरी आरोग्याच्या अंतर्गत ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक मनुष्यबळ असताना देखील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर डॉक्टरांची अनुपस्थिती दिसून आली. परभणी शहरातील साखला प्लॉट व शंकर नगर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दि ७ व ८ नोव्हेंबर ला दुपारी १२ वाजता भेट दिली असता, डॉक्टर उपस्थित नसल्यानं उपचारासाठी आलेल्या नागरिकांनी मॅक्समहाराष्ट्रा शी संवाद केला असता त्यांनी डॉक्टर नसल्यानं परत जावं लागत असल्याचं म्हटलं आहे.

हे ही वाचा :

भाजपवर ही वेळ का आली? एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

संजय राऊत लीलावती रुग्णालयात; अँजिओग्राफी होण्याची शक्यता

शिवसेनेकडून राष्ट्रवादीला पाठिंब्यासाठी अधिकृत प्रस्ताव

साथीच्या रोगाच्या अनुषंगाने परभणी मनपाच्या आरोग्य विभागा अंतर्गत ४८ टीम तयार करून शहरातील प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन कोरडा दिवस पाळण्याच्या सूचना करण्यात येत असल्याचं प्रशासनाने मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितलं आहे.

डेंग्यू मच्छरांच्या उत्पत्तीला रोखण्यासाठी स्वछ पाण्याच्या साठवण केलेल्या भांड्यात औषध टाकण्याच्या व संशयित संसर्ग झालेल्या रुग्णांच्या रक्त नमुने घेण्याच्या बाबत उपाय योजना करण्यात येत असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र, जेव्हा मॅक्समहाराष्ट्राच्या टीमने प्रत्यक्षात प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांशी बातचित केली असता नागरिकांनी मनपाच्या वतीनं कोणीही आलं नसल्याचं तसंच धूर फवारणी देखील होत नसल्याचं म्हटलं आहे.

शहरातील ताप संसर्गजन्य आजाराच्या वाढत्या पराभवाच्या बाबत मनपा सदस्य तथा आरोग्य सभापती सचिन देशमुख यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी संसर्गजन्य आजाराची स्थिती असल्याचं त्यांनी मान्य केलं. डेंग्यूबाबत अनावश्यक खोटा प्रसार केला जात असून प्रत्येक ताप किंवा सदृश्य आजार हा डेंग्यू नसल्याचं नमूद केलं आहे.

परभणी मनपाच्या वतीनं नागरी आरोग्य, हिवताप-मलेरिया विभाग व सफाई विभागाच्या संयुक्त विद्यमाने आमचे नियंत्रण करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. सदर बाबत नागरिकांनी घाबरून न जाता थेट नागरी आरोग्य केंद्रात संपर्क साधण्याचंही आव्हान केले आहे.

परभणी मनपाच्या आरोग्य विभागा अंर्तगत तापीचा रुग्णांच्या आवश्यकते नुसार रक्त चाचण्या करण्यासाठी नांदेड येथे पाठवण्याची व्यवस्था केली आल्याचं सचिन देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नियुक्त डॉक्टरांच्या व कर्मचारांच्या सेवेच्या वेळेत गैरहजर राहणा संदर्भात प्रशासनाने आपली बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला. दोन तीन दिवसांपासून केंद्राच्या योजनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे बैठका असल्यानं काही डॉंक्टरांना तिकडं जावं लागत असल्याचं सांगत बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997