Home News Update लक्ष्मण मानेंच्या राष्ट्रवादीतील घरवापसीचं हे आहे कारण…

लक्ष्मण मानेंच्या राष्ट्रवादीतील घरवापसीचं हे आहे कारण…

Support MaxMaharashtra

वंचित बहुजन आघाडीचे बंडखेर नेते आणि विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण माने शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये घरवापसी करणार आहेत. येत्या १२ एप्रिल रोजी त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लक्ष्मण माने यांनी भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर आरोप करत वंचितची साथ सोडली होती. त्यानंतर त्यांनी ‘महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी’ या पक्षाची स्थापना केली. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सुरुवातीला लक्ष्मण माने सरचिटणीस होते,  त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडी प्रवेश केला आणि आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

लक्ष्मण मानेंच्या राष्ट्रवादीतील घरवापसीचं हे आहे कारण…

वंचितचे बंडखोर नेते लक्ष्मण माने यांच्या राष्ट्रवादीतील घरवापसीचं हे आहे कारण… म्हणाले इतर कोणी वापर करण्यापेक्षा पवारांनी वापरलं तर काय वाईट? #MaxMaharashtra

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई गुरुवार, 13 फ़रवरी 2020

“मी राष्ट्रवादीत पुर्वी होतो, मधल्या काळात बाहेर पडलो होतो कारण मधल्या काळात तिथे राजेमहाराजांचा फार मोठा प्रभाव पडत होता आणि ते लोकल लेवलला मला फार त्रासाचं होतं म्हणुन मी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडली होती. परंतु बिचारे भाजपमध्ये गेल्यामुळे आता मला राषट्रवादीत जायला काही अडचण नाही” असं लक्ष्मण माने यांनी स्पष्ट केलंय.

केंद्र सरकारच्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) या निर्णयांमुळे आमचं नागरिकत्वच धोक्‍यात येणार आहे. त्यामुळे समाजात जागृती करण्यासाठी वाड्या वस्त्यांवर भटक्‍या विमुक्त, वंचितांच्या नागरिकत्वाची शोधयात्रा काढली जाईल. याची सुरुवात 12 मार्चला कराडपासून होणार आहे. यात्रेचा शेवट 12 एप्रिल रोजी बारामतीत होईल. त्यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं माने यांनी सांगितलं.

एनआरसी आणि सीएए आमच्यावर मोठं संकट आलंय. अशा परिस्थितीत आम्ही नागरिकत्व सिद्ध करू शकत नाही त्यामुळे आम्हाला मित्राची गरज आहे. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात शरद पवार महत्वाचे नेते आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाणार असल्याचं माने यांनी सांगितलं.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997