उन्नाव प्रकरण : पीडित मुलीला व तिच्या कुटुंबियांना सरकार संरक्षण का देत...

उन्नाव प्रकरण : पीडित मुलीला व तिच्या कुटुंबियांना सरकार संरक्षण का देत नाही : रमा सरोदे

unnao case, uttar pradesh, rape, bjp, news, marathi, maxmaharashtra
बापाचा जेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर उन्नाव बलात्कार पिडीत तरूणीचा आक्रंद तुम्हाला आठवत असेलच. आज ती तरूणी जीवन-मरणाची लढाई लढतेय. ‘बेटी बचाओ’ चा नारा देणाऱ्या भाजप सरकारचा आमदार या प्रकरणात आरोपी आहे. मात्र, काल रात्री अचानक उन्नाव बलात्कार पिडीतेच्या गाडीला ट्रक ने ठोकर मारल्याची बातमी आली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली असून आज ती मृत्यूशी झुंज देत आहे. पिडीतेची आई, काकू आणि वाहनचालकाचा या अपघातात मृत्यू झाला, तर पिडीत तरूणी आणि तिचा वकील गंभीर जखमी झाला आहे.
वरवर साधा अपघात आहे असं वाटत असलं तरी हे प्रकरण गंभीर असून अपघातातील ट्रकचा नंबर खोडलेला असल्यानं या पिडितेच्या जिवाला धोका असल्याचं यातून स्पष्ट होतं.
या संदर्भात कायदेतज्ञ रमा सरोदे यांनी आपलं मत व्यक्त करताना सरकारने पिडितेला सुरक्षा का पुरवली नाही? असा सवाल उपस्थित करत पिडितेच्या कुटुंबाला आत्तापर्यंत कशा प्रकारे त्रास दिला गेला? याची माहिती दिली.
या केसमधील साक्षीदार संपवले जात असल्याच्या घटनांकडं त्यांनी विशेष लक्ष वेधलं. या बाबतीत केस सीबीआयकडे सोपवण्यात आली असली तरी केसमध्ये कोणतीही प्रगती झालेली नाही. काल झालेल्या हल्ल्यामध्ये मुलीची आई मावशी दोघीही दगावल्या असून पीडित मुलगी शेवटच्या घटका मोजत आहे. एकीकडे मुलीबाबत चांगलं बोलायचं त्यांच्या संरक्षणासाठी कायदे करायचे. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा अंमलबजावणीची वेळ येते. तेव्हा मात्र, दुटप्पी भूमिका घ्यायची असं म्हणत या सर्व प्रकरणात सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.