Home News Update कोलाड -रिव्हर राफ्टिंगच्या डेस्टिनेशवर बेरोजगारीची कुऱ्हाड

कोलाड -रिव्हर राफ्टिंगच्या डेस्टिनेशवर बेरोजगारीची कुऱ्हाड

215
0
Support MaxMaharashtra

निसर्ग, गड किल्ले, विस्तीर्ण समुद्रकिनारा अशी रायगड जिल्ह्याची ओळख आहे. रोहा तालुक्यातील निसर्गाच्या कुशीत वसलेलं कोलाड गाव. गावातून कुंडलिका नदी वाहते. या प्रवाही पाण्याचा वापर करत, स्थानिक युवकांनी २० वर्षापुर्वी रिव्हर राफ्टिंगचा व्यवसाय सुरु केला.

रोहा तालुक्यातील कोलाड हे निसर्गरम्य गाव आहे. इथल्या कुंडलिका नदीच्या प्रवाही पाण्यासोबत वाहत जाण्याचा थरारचं वेगळा असतो. साहसी पर्यटनाचा हा थरार अनूभवण्यासाठी देशभरातून शेकडो पर्यटक कोलाड इथ यायला लागले. त्यामुळे लवकरचं कोलाड रिव्हर राफ्टिंग आणि साहसी पर्यटनाचं हॉट डेस्टिनेशन म्हणून उदयास आलं.
या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांमुळं स्थानिक युवकांना रोजगाराचं साधन मिळालच, मात्र या परिसरातील अनेकांच्या हाताला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष काम मिळालं. मात्र २० वर्षानंतर शासनाच्या नव्या धोरणामुळे कोलाडमध्ये पुन्हा बेरोजगारीच संकट निर्माण झालंय. या उद्योगावर शासनाने जाचक अटी लादल्या आहेत. त्यामुळे रिव्हर राफ्टींगचा व्यवसाय गुंडाळण्याची वेळ स्थानिक उद्योजकांवर आलीये.

कोलाडममध्ये रिव्हर राफ्टींग सेंटरमुळे पर्यटकांची गर्दी वाढायला लागली होती. त्यामुळे या उद्योगातील अर्थकारणही वाढलं होत. लघु पाटबंधारे विभागानं ही वेळ साधत रिव्हर राफ्टींग उद्योगासाठी नवं धोरण आखलं. रिव्हर राफ्टिंग सेंटर सुरु करण्यासाठी आता ऑनलाईन निविदा भराव्या लागणार आहे. त्यामुळे इतर कंपन्या रिव्हर राफ्टिंगच्या व्यवसायात उतरु शकतात.

रिव्हर राफ्टिंग सेंटर सुरु करण्यासाठी निविदा रक्कमेत आणि  अमानत रक्कमेत तिपट्टीने वाढ करण्यात आलीये. त्यामुळे महिन्याकाठी सहा ते सात लाख रुपये कमावणाऱ्या उद्योजकांसाठी एवढी मोठी रक्कम भरणे कठिण आहे.

२० वर्षापुर्वी कोलाड इथ राहणाऱ्या महेश सानप यांनी रिव्हर राफ्टिंग व्यवसायातील उज्वल भविष्य ओळखलं. काही भागभांडवल गोळा करुन सानप यांनी कोलाड इथ रिव्हर राफ्टींग सेंटर सुरु केलं. या व्यवसायातील सानप यांची भरारी बघता, गावातले इतर १० तरुण या व्यवसायात आले. इथल्या रिव्हर राफ्टींग सेंटरमुळे गावाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली.
साहसी खेळामुळे इथ येणाऱ्या पर्य़टकांची संख्या वाढत गेली त्यामुळे पर्यटकांना लागणाऱ्या विवीध सोयी सुविधा पुरवण्याचा व्यवसाय या भागात बहरला. या परिसरात नवी हॉटेल्स, रिसॉर्ट, होम स्टे, कॅम्प साईट अस्तित्वात आली. रिव्हर राफ्टिंगमुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ७०० ते ८०० स्थानिकांना रोजगार मिळतोय. रिक्शा, भाजी,फळ विक्रेते, किराणा दुकानांना व्यवसाय मिळालाय.

सर्व व्यवस्थित चाललं असतांना, अचानक शासनानं कंत्राट मिळवण्याच्या रक्कमेत अवाजवी वाढ केल्यानं महेश सानप आता हतबल झालेत. सानप यांना या सेंटरच्या माध्यमातून महिन्य़ाकाठी ६ ते ७ लाख रुपयाचं उत्पन्न मिळायचं. मात्र आता एवढे पैसै कुठून आणायचे हा प्रश्न त्यांना पडला आहे.

गेली 20 वर्षे कुंडलिका नदीच्या कुशीत राफ्टिंगचा व्यवसाय केला. त्याच नदीत जलसमाधी घेण्याचा इशारा महेश सानप यांनी दिला.

 

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997