डॉक्टरांचा भोंगळ कारभार; सरकारी रुग्णालये रामभरोसे..!

सामान्य नागरिक आजारी पडल्यावर सरकारी दवाखान्यातील डॉक्टर त्यांच्यासाठी देव असतात असं म्हंटल जातं. परंतु, शासकीय  रुग्णालयात वैदकीय अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार पाहता सामान्य लोकांचा विश्वास उडेल अशीच एक घटना बीड जिल्यातील रुग्णालयात उघडकीस आली आहे.

वैद्यकीय अधिकारी शासकीयरुग्णालयातील रुग्णांकडे लक्ष न देता स्वतःच्या खाजगी रुग्णालयाच्या व्यवसायात व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. तीन दिवसांपूर्वी एका युवकाच्या डोक्यावर शास्त्रकिया याच सरकारी रुग्णालयात पार पडली. त्यानंतर डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्यामुळे  रुग्णाच्या जखमेत आळ्या झाल्याचं निदर्शनास आले.

दरम्यान, शासकीय वैद्यकीय व्यक्तीशी आम्ही संपर्क करण्याचा  केला असता त्यांनी आमच्याकडे वेळ नसल्याचं कारण सांगून फोन ठेवला. डॉक्टर रुग्णाकडे लक्ष देणार नाही, मग द्यायचं  तरी कोणी असा प्रश्न उपस्थित होतोय. रुग्णाची तब्येत गंभीर असून राज्यातील सरकारी डॉक्टरांची वैद्यकीय सेवेमध्ये अशी कमतरता आणि दुर्लक्ष असेल तर सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवं.