कॉंग्रेसच्या एकमेव खासदाराची, मोदींवर खालच्या पातळीवर टीका

सभेत उपस्थित जनतेकडून प्रतिसाद मिळवण्याच्या नादात नेते अनेकदा बेताल वक्तव्य करून जातात. यात कधी आक्षेपार्ह भाषेचा वापरही केला जातो. चंद्रपूरातील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचाही असाच एक प्रताप समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना धानोरकर यांनी अत्यंत आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानभरपाई संदर्भात काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी संबोधीत करताना धानोरकर यांचा तोल सुटला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अत्यंत खालच्या शब्दात टीका केली.