Home > Uncategorized > काँग्रेसच्या १२ आमदारांना तेलंगणा उच्च न्यायालयाची नोटीस 

काँग्रेसच्या १२ आमदारांना तेलंगणा उच्च न्यायालयाची नोटीस 

काँग्रेसच्या १२ आमदारांना तेलंगणा उच्च न्यायालयाची नोटीस 
X

तेलंगणा – कॉंग्रेस पक्षातील 12 आमदारांनी नुकताच टीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. या प्रकरणी काँग्रेसने तेलंगणा उच्च न्यायालयात आमदारांच्या पक्षांताराबाबत याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तेलंगणा उच्च न्यायालयाने या १२ आमदारांना नोटीस बजाविली आहे. याबाबत त्यांना चार आठवड्यांमध्ये खुलासा देण्याचे आदेश देण्यात न्यायालयाने दिले आहेत. तसेच न्यायालयाने याप्रकरणी तेलंगणा विधानसभेच्या सभापतींसह अध्यक्ष, सचिव आणि निवडणूक आयोगालाही नोटीस बजावली आहे. दरम्यान, कॉंग्रेसच्या 18 आमदारांपैकी 12 आमदारांनी 6 जून रोजी तेलंगणा विधानसभा अध्यक्षांची भेट घेवून टीआरएस पक्षात प्रवेश करण्याची विनंती करत पक्षांतर केले होते. या विरोधात कॉंग्रेसच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती.

Updated : 13 Jun 2019 4:39 AM GMT
Next Story
Share it
Top