Home > Uncategorized > सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज निष्पक्षरित्या होत नसल्याचा न्यायमूर्तींचा गौप्यस्फोट 

सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज निष्पक्षरित्या होत नसल्याचा न्यायमूर्तींचा गौप्यस्फोट 

सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज निष्पक्षरित्या होत नसल्याचा न्यायमूर्तींचा गौप्यस्फोट 
X

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यामूर्तींनी घेतली पत्रकार परिषद घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज निष्पक्षरित्या होत नसल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चलमेश्वर यांनी केलाय. आम्ही यासंदर्भात आम्ही सरन्यायाधीशांनाही पत्र लिहीले होते. पण आता आमच्यासमोर नाईलाज आहे, असा गंभीर आरोप सुप्रीम कोर्टाच्या चार वरिष्ठ न्यायाधीशांनी केला आहे.

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन अशा स्वरुपाचे आरोप केले आहेत.देशात न्यायव्यवस्था टिकली नाही तर लोकशाही टिकणार नाही असे असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चलमेश्वर यांनी म्हटलं आहे. तसेच काही महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालय प्रशासन नीट काम करत नाही. मुख्य न्यायाधिशांची भेट घेऊन प्रश्न मांडले पण उपयोग न झाल्याने जनतेसमोर आल्याचे सांगत, यापूर्वी न्यायव्यवस्थेत अशा गोष्टी घडल्या नाहीत. चीफ जस्टिसना दिलेले पत्र सार्वजनिक करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. न्यायमूर्ती जे. चेलमेश्वरांसह, रंजन गोगोई, मदन लोकुर आणि कुरियन जोसफ यांनी परिषद घेतली.

Updated : 12 Jan 2018 7:33 AM GMT
Next Story
Share it
Top