Home > Uncategorized > पर्यावरणसंबंधित प्रकल्पाना तत्काळ मंजुरी देणार - जावडेकर

पर्यावरणसंबंधित प्रकल्पाना तत्काळ मंजुरी देणार - जावडेकर

पर्यावरणसंबंधित प्रकल्पाना तत्काळ मंजुरी देणार - जावडेकर
X

राज्यभरात मेट्रो, रेल्वेचे प्रकल्प, जेट्टी, ट्रान्सहार्बर लिंक, कोस्टल रोड, नद्यांचे शुद्धीकरण, विविध स्मारकांच्या कामाचा प्रस्ताव केंद्राकडे आल्यास त्यांना तत्काळ पर्यावरणविषयक मंजुरी तातडीने दिली जाईल, असे आश्वासन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले. अनेक महत्त्वाचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांसाठी पर्यावरण विभागाची परवानगी अत्यंत महत्त्वाची असते.

‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे आयोजित पर्यावरण आणि वन विभागाच्या प्रलंबित प्रस्तावावर चर्चा करताना बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील उपस्थित होते. देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविताना पर्यावरणाचा र्‍हास होणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. याविषयीची आवश्यक ती काळजी घेतल्याचे राज्यातील विविध प्रकल्पाच्या कामावरून दिसून येते. जंगल क्षेत्रात विविध कामे करताना वन्य जीवांना धोका निर्माण होणार नाही, त्याचबरोबर जवळपासच्या ग्रामस्थांचे लोकजीवन सुरक्षित राहील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Updated : 8 Jun 2019 5:44 AM GMT
Next Story
Share it
Top