Home > Uncategorized > रक्षा खडसे रावेरच्या लोकसभा उमेदवार- पकंजा मुंडे

रक्षा खडसे रावेरच्या लोकसभा उमेदवार- पकंजा मुंडे

रक्षा खडसे रावेरच्या लोकसभा उमेदवार- पकंजा मुंडे
X

सध्या 2019च्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. त्याचप्रकारे भाजपही निवडणुकांच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे. तसेच या निवडणुकांमध्ये महिला उमेदवारही ताकदनिशी उतरणार आहे. होय येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत रावेर मतदार संघातून रक्षा खडसे ह्याच खासदार होतील असा दावा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलाय.

विशेष म्हणजे भाजपन आमदार, खासदार यांच्या मतदार संघावर सर्व्हे केला होता यात रक्षा खडसे ह्या पिछाडीवर आहेत असा अहवाल आल्याच्या बातम्या आल्या होत्या , या अहवालावरून भाजप नेते एकनाथ खडसे यांनी टीका केली होती, एकनाथ खडसे यांच्या भाजप खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध वक्तव्य करत असल्याने रावेर लोकसभा मतदार संघात भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे ह्यांना तिकीट मिळणार की नाही अशी जोरदार चर्चा होती, मात्र खडसे यांचे मागे कायम पाठीराखे असलेले दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रक्षा खडसेंच रावेर च्या खासदार म्हूणन राहतील अस जाहीर केल्याने अनेक राजकीय तर्कवितर्क काढले जाताहेत.

खासदार रक्षा खडसे ह्यांनी भुसावळ येथ येथ बहिणाबाई मोहत्सव आयोजित केला होता त्यासाठी पंकजा मुंडे आल्या होत्या, यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे, पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते.

Updated : 22 Dec 2018 1:13 PM GMT
Next Story
Share it
Top