Home > Uncategorized > राहुल गांधी हाजीर हो

राहुल गांधी हाजीर हो

राहुल गांधी हाजीर हो
X

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयात सुरू असलेल्या अवमान याचिकेप्रकरणी बुधवारी सुनावणी झाली. या सुनावणीच्या वेळी ते गैरहजर असल्याने त्यांची बाजू वकील नारायण अय्यर यांनी मांडली. पण न्यायालयाने त्यांना पुढच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी होणार आहे.

महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केल्याचा आरोप त्यांनी प्रचारसभेत केल्याने भिवंडी न्यायालयात त्यांच्या विरोधात याचिका दाखल आहे. गेल्या वेळी झालेल्या सुनावणीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना भिवंडी कोर्टात हजर झाले होते. महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घडवून आणली, असे विधान राहुल गांधी यांनी भरसभेत केले होते. या प्रकरणावरूनच भिवंडी न्यायालयात राहुल गांधींविरोधात सुनावणी सुरू आहे.

Updated : 17 Jan 2018 2:11 PM GMT
Next Story
Share it
Top