अयोध्या निकालावर सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची प्रतिक्रिया

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल सुनावला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन राम मंदिरासाठी देण्यात यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी पाच एकर मोक्याची पर्यायी जागा द्यावी असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिलेल्या निकालात म्हटलं आहे.

नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी सध्या अयोध्याच्या निकाला संबंधित त्यांच्या मताचा एक व्हिडीओ फेसबुक वर पोस्ट केला आहे.

“अयोध्या प्रकरणी न्यायालयाने निकाल दिला आहे, सर्व लोकांनी मानवता हाच धर्म मानून न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत करावे, पुढे देखील असे कोणतेही प्रश्न आले तरी दंगल न करता न्यायालयांचे निर्णय आहेत ते मान्य करून शांततापूर्ण वातावरण संतुलित ठेवणे गरजेचे आहे.”

असे त्यांनी जनतेला आवाहन केले आहे.