Home > Uncategorized > दोस्ती की प्रेम...? का उखडली विनेश फोगाट मिडीयावर

दोस्ती की प्रेम...? का उखडली विनेश फोगाट मिडीयावर

दोस्ती की प्रेम...? का उखडली विनेश फोगाट मिडीयावर
X

कुस्तीपटू विनेश फोगाट सध्या मिडीयावर उखडलीय.मिडीयात आलेल्या बातम्यांबद्दल खेद व्यक्त केलाय.

एशिएन गेम्समध्ये भारताला कुस्तीतलं पहिलं सुवर्ण पदक मिळवून देणारी गोल्डन गर्ल विनेश फोगाट चर्चेत आहे तिच्या प्रेमप्रकरणाच्या अफवेवरून. ती ज्या वेळी सुवर्ण पदकासाठी गेम खेळत होती त्यावेळेस भालाफेकीतील स्टार एथिलिट निरज चोप्रा अतिशय प्रेमाने हा खेळ पाहण्यात गुंग झाला होता, या साठी त्याने आपली प्रॅक्टीस ही चुकवली असा आरोप केला जातोय.

काही वृत्तपत्रांनी निरज चोप्राचा स्टेडीअम मधला फोटा वापरून ही प्रेमकहाणी रंगत असल्याच्या बातम्या छापल्या होत्या. भारताबाहेर गेल्यानंतर भारतीय खेळाडू सर्वानाच सहकार्य करतात मात्र त्या सहकार्याचा गैरअर्थ भारतीय मिडीयाच का काढते आहे? असा प्रश्नही फोगाट यांनी व्यक्त केला आहे. विवीध क्रिडा क्षेत्रात भारतीय महिलांची कामगिरी वाढतांना आपल्याला दिसत आहे मात्र त्याच वेळेस या खेळाडूंच्या कौशल्यावर न बोलता त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात उगाच डोकावण्याचा प्रयत्न होताना दिसत आहेत हि खरतर भारतीयांसाठी लज्जास्पद गोष्ट आहे.

Updated : 24 Aug 2018 6:36 AM GMT
Next Story
Share it
Top