Home > Uncategorized > छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होणार समता मेळावा.. 

छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होणार समता मेळावा.. 

छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होणार समता मेळावा.. 
X

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दोन वर्षे कारागृहात काढल्यानंतर, महाराष्ट्रातील पहिला समता परिषदेचा मेळावा 29 सप्टेंबर रोजी बीडमध्ये होत आहे. या मेळाव्यात ते विविध विषयांवर बोलणार असल्याचे ,समता परिषदेचे उपाध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांनी सांगितलंय.

समता परिषदेचे सर्वेसर्वा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे , माजी मंत्री आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत हा मेळावा होत आहे . मेळावा यशस्वी करण्यासाठी मोठा प्रयत्न सुरू आहेत . मेळाव्यात आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ते राजकीय भाष्य करण्याची शक्यता आहे.यामुळं बीडमध्ये छगन भुजबळ काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मेळाव्याचे आयोजन जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत यांनी केलंय...

Updated : 25 Sep 2018 1:13 PM GMT
Next Story
Share it
Top