Home > Uncategorized > सोशल मीडियाच्या अफवेतून धुळ्यात ५ जणांची ठेचून हत्या

सोशल मीडियाच्या अफवेतून धुळ्यात ५ जणांची ठेचून हत्या

सोशल मीडियाच्या अफवेतून धुळ्यात ५ जणांची ठेचून हत्या
X

मुलं पळवल्याच्या संशयावरुन साक्री तालुक्यातील राईनपाड्यातील ग्रामस्थांनी पाच जणांची ठेचून हत्या केली आहे. हे पाचही जण सोलापूरचे आहेत. आज दुपारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र ग्रामस्थांनी पोलिसांनाही जबर मारहाण केली. यात दोन पोलीस जखमी झाले.

सातारा आणि सांगलीतील सात जण राईनपाड्यात आले होते. बाजार असल्यानं मुलं पळवायला टोळी आल्याची अफवा यावेळी गावात पसरली. यानंतर ग्रामस्थांनी पाच जणांना ठेचून मारलं आणि त्यांचे मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयात टाकून दिले.तसेच यावेळी पोलिसांना देखील मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक छोरींग दोरजे साक्रीकडे रवाना झाले आहेत. सध्या याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Updated : 1 July 2018 1:58 PM GMT
Next Story
Share it
Top