काय आहे चारा घोटाळा?
X
काय आहे चारा घोटाळा?
बिहारच्या पशुपालन विभागात घोटाळा झाल्याचं १९९६ साली प्रथम उघड झाले. त्यावेळी तब्बल ९५० कोटी रुपयांचा घोटळा झाल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली. या दरम्यान लालूप्रसाद यादव मुख्यंमंत्री असताना पशुसंवर्धन खात्यात विविध जिल्ह्यात चारा, औषधे आणि उपकरणे खेरेदीच्या नावाखाली बनावट बिलांद्वारे बेकायदेशीररित्या करोडो रुपये काढले गेले, असा आरोप आहे. या घोटाळ्यात तीन वेगवेगळी प्रकरणे असून या तिन्ही प्रकरणात लालू आरोपी आहेत. ही तीनही प्रकरणाची वेगवेगळी सुनावणी न करता एकत्र करावी अशी विनंती लालूंनी कोर्टाला केली होती. मात्र कोर्टाने त्यांची मागणी अमान्य केली होती. या एकाही प्रकरणात ते दोषी आढळल्यास लालूंना तुरुंगवास होऊ शकतो. २०१३ साली कोर्टाने त्यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती आणि त्यांना पुढील ११ वर्ष निवडणूक लढवण्यावर बंदीही आणली होती. मात्र सध्या जामिनावर लालूप्रसाद तुरुंगाबाहेर आले आहेत.
चारा घोटाळ्यात एकूण ३८ आरोपी होते. यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला. तिघेजण सीबीआयचे साक्षीदार बनले आणि आपला गुन्हा मान्य केला होता. त्यानंतर त्या तिघांनाही २००६-०७ मध्ये शिक्षा सुनावली गेली. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यासह माजी मुख्यमंत्री जन्नाथ मिश्रा, बिहारचे माजी मंत्री विद्यासगर निषाद, पीएसीचे तत्कालनी अध्यक्ष जगदीश शर्मा आणि ध्रुव भगत, आर. के. राणा, तीन आयएएस अधिकारी, फूलचंद सिंह, बेक ज्युलिएस उर्फ महेश प्रसाद, एस के भट्टाचार्य, पशू चिकित्सक डॉ. के. के. प्रसाद आणि इतर चार आरोपींचा समावेश होता. त्यामुळे आता एकूण २२ आरोपींविरोधात रांची कोर्टात निर्णय दिला गेला आहे.