Home > Uncategorized > कोपर्डी निकाल २९ तारखेला

कोपर्डी निकाल २९ तारखेला

कोपर्डी निकाल २९ तारखेला
X

'त्यांना फाशीच द्या', सरकारी वकिलांची मागणी

कोपर्डी बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील अंतिम निकाल २९ तारखे पर्यंत राखून ठेवला आहे. आता या प्रकरणातील आरोपिंना फाशी होणार की जन्मठेप याचा निकाल २९ तारखेलाच न्यायालय सुनावेल. कोपर्डी प्रकरणात आज विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी आपली अंतिम युक्तीवाद न्यायालयात मांडला. यात त्यांनी या सर्व आरोपिंना फाशीची शिक्षाच व्हावी अशी न्यायालयाकडे मागणी केली. न्या़यालयाने कोपर्डी हत्याकांड आरोपिंना दोषी ठरवल्या नंतर काल मंगळवार पासून दोन्ही बाजूकडून अंतिम युक्तीवादाला सुरुवात झाली होती. कालच्या आरोपिंच्या वकिलाच्या युक्तीवादानंतर आज सरकारी वकिल उज्वल निकम यांनी आपला अंतिम युक्तीवाद न्यायालयासमोर मांडला. यात निकम यांनी आरोपिच्या वकिलांतची आरोपी शिक्षित असून तसेच घरातीली एकमेव आधार असून त्यांना फाशी न होता जन्मठेप व्हावी ही मागणी खोडून काढत दोषींची क्रुर कृत्य लक्षात घेता त्यांना फाशीच व्हावी अशी मागणी केली.

न्यायालयाने आता दोन्ही पक्षाचा अंतिम युक्तवाद एेकुण घेऊन यावरचा निकाल २९ तारखे पर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे या नराधमांना फाशी की जन्मठेप यासाठी पुढच्या बुधवारपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

Updated : 22 Nov 2017 8:28 AM GMT
Next Story
Share it
Top